• Download App
    हरियाणाची पुनरावृत्ती हिमाचलात : हिमाचलमध्ये पॉवर गेमचे मोहरे खेळवायला विनोद तावडे शिमल्यात Vinod Tawde arrives in Shimla to play pawns of the power game in Himachal

    हरियाणाची पुनरावृत्ती हिमाचलात : हिमाचलमध्ये पॉवर गेमचे मोहरे खेळवायला विनोद तावडे शिमल्यात

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गुजरात मध्ये भाजप विधानसभा निवडणुकीत केवळ नरेंद्र का रेकॉर्ड भूपेंद्र तोडेगा इथपर्यंतच मर्यादित राहिला नसून आता तिथे माधव सिंह सोळंकी यांचे 149 जागांचे रेकॉर्ड पण भाजप तोडताना दिसत आहे. पण त्याच वेळी हिमाचल प्रदेश मध्ये सत्तेसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. Vinod Tawde arrives in Shimla to play pawns of the power game in Himachal

    तिथे भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर सुरू असताना सत्तेची समीकरणे भाजपच्या बाजूने खेचून आणण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना भाजप हायकमांडने तातडीने हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्याला धाडले आहे. विनोद तावडे आता हिमाचलच्या राजकीय पटावरील मोहर यांच्या हालचालींमध्ये निर्णायक भूमिका बजावणार आहेत.



    विनोद तावडे यांनी हरियाणा मध्ये 2019 मध्ये सत्तेचे मोहरे हलवले होते. ते हरियाणाचे भाजपचे प्रभारी होते. आज हरियाणा मध्ये मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली जे भाजपचे सरकार अस्तित्वात आहे, ते आणण्यात विनोद तावडे यांनी केलेल्या राजकीय खेळीचा महत्त्वाचा वाटा आहे.

    आता भाजपा हायकमांडने हिमाचल मधल्या सत्ता समीकरणाची सूत्रे हलवण्यासाठी विनोद तावडे यांना शिमल्याला धाडले आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर चालू असताना तिथे काही अपक्ष म्हणजेच भाजपचे बंडखोर उमेदवार जिंकत आहेत. या बंडखोरांच्या संपर्कात राहून त्यांना पुन्हा भाजपच्या गोटात वळवून आणण्याची जबाबदारी तसेच अनटॅप्ड सोर्सेस टॅप करण्यासाठी विनोद तावडे यांना शिमल्याला धाडण्यात आले आहे. हरियाणातली कामगिरीची ते हिमाचलमध्ये पुनरावृत्ती कशी करतात?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Vinod Tawde arrives in Shimla to play pawns of the power game in Himachal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!