• Download App
    मुख्यमंत्री पी. विजयन यांनी महत्त्वाची खाती ठेवली स्वतःकडेच, वीणा जॉर्ज यांच्याकडे आरोग्य मंत्रालय|Vina George become new health minister

    मुख्यमंत्री पी. विजयन यांनी महत्त्वाची खाती ठेवली स्वतःकडेच, वीणा जॉर्ज यांच्याकडे आरोग्य मंत्रालय

    विशेष प्रतिनिधी

    तिरूअनंतपुरम : केरळमध्ये मुख्यमंत्री पी. विजयन यांनी महत्त्वाची खाती स्वतःच्याच हातामध्ये ठेवली असून त्यामध्ये गृह आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचा समावेश आहे.Vina George become new health minister

    विजयन यांचे जावई पी.ए, मोहंमद रियाझ यांना सार्वजनिक बांधकाम आणि वीणा जॉर्ज यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.



    वीणा जॉर्ज या माजी पत्रकार असून त्या नुकत्याच अरणमुला मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. मागील सरकारमधील लोकप्रिय मंत्री के.के. शैलजा यांच्याऐवजी जॉर्ज यांना संधी देण्यात आली आहे.

    गृह, देखरेख आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती विजयन यांच्या ताब्यात असतील त्यांचे विश्वामसू सहकारी के.एन. बालागोपाल यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. पक्षातील दिग्गज नेते टी.एम.थॉमस इसाक यांच्याऐवजी त्यांना संधी देण्यात आली आहे.

    वीणा जॉर्ज यांच्याकडे महिला आणि बालकल्याण हे खाते देखील सोपविण्यात आले आहे. विजयन यांनी गुरुवारीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खातेवाटप केले होते आज ते अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले.

    Vina George become new health minister

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये