वृत्तसंस्था
अंदमान – विजयादशमीचा सीमोल्लंघनाचा मुहूर्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संरक्षण क्षेत्रातल्या ७ कंपन्या अर्पण केल्या, तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांसह हजारो स्वातंत्र्यवीरांना श्रध्दांजली अर्पण केली.Vijayadashami Amit Shah’s seam violation in Andaman Cellular Jail; Savarkar went to the cell and paid homage
आपला दोन दिवसांचा गोवा दौरा आटोपून अमित शहा आज दुपारी अंदमानला पोहोचले. तेथे जाताच त्यांनी शहीद स्मारकारवर पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील योध्द्यांना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी सेल्युलर जेलमधल्या सावरकर कोठडीत जाऊन स्वातंत्र्यावीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी देशाच्या संरक्षणासंबंधी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बाबींचे महत्त्व अधोरेखित केले. स्वातंत्र्यानंतर देश शस्त्रसंपन्न झाला पाहिजे, असा ध्यास सावरकरांनी घेतला होता. परंतु, त्याकडे तत्कालीन सरकारने दुर्लक्ष केले होते.
आज सावरकरांच्या स्वप्नातला बलशाली भारत घडविण्याचे प्रयत्न मोदी सरकार करताना दिसत आहे. एवढेच नाही, तर सावरकरांचे नामाभिधान लावून हे प्रयत्न सुरू आहेत, असेच मोदी आणि शहा यांनी आजच्या आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
Vijayadashami Amit Shah’s seam violation in Andaman Cellular Jail; Savarkar went to the cell and paid homage
महत्त्वाच्या बातम्या
- महादेव जानकर म्हणाले – ‘मेळाव्याला बोलावलं नाही तर श्रोत्यांमध्ये बसणार ; भाऊ म्हणून पंकजा मुंडेंच्या कायम पाठीशी
- Cruise Drugs Case : आर्यन खान बनला कैदी नंबर ९५६, खान कुटुंबाने मनी ऑर्डरने तुरुंगात पाठवले ४५०० रुपये
- बिन लायसन्सचा व्हॉल्वो ड्रायव्हर ते सायकल चोर मुख्यमंत्री; गुलाबराव पाटलांकडून ही शिवसेनेची स्तुती की ऐशीतैशी…!!??
- प्रीतम मुंडेंची मंडे टू संडे अशी हाक , उपस्थित राहिलेले सर्वजण मुंडे परिवाराचा भाग