दारूबंधी उठविणे शासनाच्या अपयशाची कबुली आहे. चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याची मागणी स्वत: पालकमंत्र्यांनी घोषित करून मग त्याचे समर्थन करण्यासाठी शासकीय समितीचा फार्स केला. आता शासनाचा निर्णय करवून घेतल्याची टीका पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी केली आहे.Vijay Vadettiwar lifted the ban by forcing the government committee, Padma Shri Abhay Banga and Dr. Rani Banga criticises
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : दारूबंधी उठविणे शासनाच्या अपयशाची कबुली आहे. चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याची मागणी स्वत: पालकमंत्र्यांनी घोषित करून मग त्याचे समर्थन करण्यासाठी शासकीय समितीचा फार्स केला.
आता शासनाचा निर्णय करवून घेतल्याची टीका पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी केली आहे.महाविकास आघाडी आणि पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हट्टाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला.
यावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होत आहे. गडचिरोली, चंद्रपूर भागात आदिवासींच्या आरोग्यावर काम करणाºया डॉ. बंग यांनी शासनावर टीका करताना म्हटले आहे की, हे दारुबंदीचं अपयश आहे
की मंत्री-शासनाचे? जिल्ह्यातील 1 लाख महिलांचे आंदोलन, 585 ग्रामपंचायती व जिल्हापरिषदांचा ठराव यामुळे शासनाने 6 वर्षांपूर्वी दारूबंदीचा निर्णय घेतला होता. त्या दारूबंदीची अंमलबजावणी पुरेशी झाली नाही हे अगदी खरं आहे.
पण सरकारच्या कोणत्या योजनेची आणि कायद्याची अंमलबजावणी 100 टक्के होते? मग या सर्व योजना-कायदे रद्द करणार का? शासनाला कोरोना नियंत्रण नीट करता येत नाही. म्हणून कोरोना नियंत्रणाचं कामही थांबवणार का?
अजित पवारांनी चंद्रपूरच्या दारुचा कर नको सांगितलं, मग हा पैसा कुणाला हवाय? सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी दारुबंदी हटवायची असल्याचाही दावा केला जातो.
मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार मला व्यक्तीश: म्हणाले की सरकार चालवायला, अर्थसंकल्प करायला मला चंद्रपूरच्या दारुच्या कराची गरज नाही. त्यामुळे सरकारच्या या तर्कात अर्थ नाही, असेही डॉ. बंग म्हणाले.
डॉ. राणी बंग म्हणाल्या, चंद्रपूरच्या इतिहासातील हा अत्यंत काळा दिवस आहे. पालकमंत्री आपल्या भावी पीढिच्या रक्षणासाठी असतात. मात्र, चंद्रपूरचे पालकमंत्री निवडून आल्यापासून दारुबंदी उठवण्याच्या कार्यक्रमाचा घोषा लावत होते.
जणुकाही दारुबंदी उठवण्याच्या एकमेव कामासाठी ते निवडून आले होते. अर्थात त्यांनी त्यांचा शब्द खरा करुन दाखवला आहे. मात्र, मंत्रिमंडळाने हीच तत्परता कोरोनाचं नियंत्रणासाठी खर्ची घातली असती तर अधिक चांगलं झालं असतं.
डॉ. बंग म्हणाले, दारूबंदीची अंमलबजावणी गडचिरोली, बिहारमध्ये होते, मग चंद्रपुरात का नाही? अंमलबजावणी नीट होत नाही तर नीट करा! त्यासाठीच शासन आहे, मंत्री आहेत.
दारूबंदीची अंमलबजावणी शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यात चांगली होते, बिहारमध्ये चांगली होते, मग चंद्रपुरात का करता येत नाही? की ती करायचीच नाही?डॉ. अभय बंग म्हणाले, जिल्ह्यात 1000 कोटी रुपयांची अधिकृत आणि 500 कोटींची अनधिकृत दारू दरवर्षी विकली जाईल.
1500 कोटींचे दारू-सम्राट निर्माण होतील. राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातली प्रभावी दारूबंदी, बिहारमधील दारूबंदी यापासून शिकून चंद्रपूरमध्ये देखील यशस्वी दारू नियंत्रण करायला हवे.
दारूबंदी उठविणे ही अपयशी शासनाची कबुली आहे. दु:ख एवढेच की या अपयशातून जिल्ह्यात दारू साम्राज्य व स्त्रियांच्या दु:खाचा सागर जन्माला येईल.डॉ. बंग म्हणाले, जिल्ह्यातील 4 लाख पुरुष दारू पितील, 1500 कोटी रुपये त्यावर उडवतील.
त्यांच्या कुटुंबांचे काय होणार? जवळपास 80,000 व्यसनी निर्माण होतील. त्याला जबाबदार कोण? त्यांची व्यवस्था काय? स्त्रियांवर अत्याचार, गुन्हे, बलात्कार, मारपीट हे प्रचंड प्रमाणात वाढतील.
त्यासाठी जबाबदार कोण ? दारूबंदी असलेल्या शेजारच्या गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात चंद्रपूरमधील दारू आयात होईल. ती कोण व कशी थांबवणार ?
Vijay Vadettiwar lifted the ban by forcing the government committee, Padma Shri Abhay Banga and Dr. Rani Banga criticises
महत्त्वाच्या बातम्या
- फेसबुकनेही मान्य केले कोरोना व्हायरस लॅबमध्येच बनविला, आता कोरोना मानवनिर्मित असल्याच्या पोस्ट डिलीट होणार नाहीत
- कोरोना विषाणूच्या मुळावरुन खवळलेल्या चीनने उगाळला अमेरिकेचा ‘काळा इतिहास’
- संकटमोचक बॉबी नसणे ममता बॅनर्जींसाठी सर्वाधिक डोकेदुखी
- सोलापुरकरांच्या एकजुटीपुढे राष्ट्रवादीची माघार, उजनीतून पाणी घेण्याचा आदेश रद्द
- दिलासादायक : भारतामध्ये १२ वर्षांवरील सर्वांना लवकरच लस; Pfizer ने मागितली केंद्राकडे ‘फास्ट ट्रॅक’ परवानगी