विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – बांगलादेशात सुरू असलेले हिंदूंचे हत्याकांड संतापजनक असून संयुक्त राष्ट्राने त्या देशात शांतीसेना पाठवावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. मुस्लिम मतांसाठी बांगलादेशातील नरसंहारावर कॉंग्रेस व विरोधी पक्ष देशाबरोबर गद्दारी करत आहेत असाही आरोप त्यांनी केला.VHP says send shantisena in Bangaladesh
बांगलादेशातील परिस्थिती गंभीर आहे. तेथे हिंदू नागरिकांवर वाढते हल्ले होत आहेत. त्यामुले संयुक्त राष्ट्रांनी त्या देशाबाबत कठोर निर्णय घेऊन तातडीने कारवाई करावी व तेथे शांतीसेना पाठवावी, अशीही मागणी जैन यांनी केली.
काश्मीरमधील हत्याकांडाचा प्रेरक पाकिस्तान असून त्या देशाचे कंबरडे मोडले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले. जगात केवळ भारतातील मुस्लिम समाज शांततेने राहतो आहे, असे सांगून जैन म्हणाले, की त्या त्या देशातील गैर मुस्लिमांना जिवंत ठेवणार नाही हा बांगलादेश, पाकिस्तान व अफगाणिस्तानातील एकमेव अजेंडा आहे. काश्मीहरमध्ये त्याचेच पडसाद उमटत आहेत.
देशातील सरकार काश्मीरबाबत कधी नव्हे एवढी कठोर पावले उचलत आहे. काश्मिरात ३७० वे कलम रद्द केल्यावर सामान्य काश्मिरी मुस्लिम नागरिकाला विकास हवा आहे. मात्र दहशतवाद्यांची हिंमत पाकिस्तानमुळे वाढली आहे हे स्पष्ट असल्याने केंद्राने तशी पावले उचलावीत अशी मागणी विहिंप करत आहे.
VHP says send shantisena in Bangaladesh
महत्त्वाच्या बातम्या
- उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नाही वाटते, संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय, चित्रा वाघ यांची टीका
- असाही माहिती अधिकार, बिल्डरकडून 10 लाखांची खंडणी घेताना माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक
- जावयाच्या चार महिन्यांपूर्वी सुरू कंपनीला हसन मुश्रीफ यांनी दिले कंत्राट, किरीट सोमय्या यांचा आरोप
- रशियात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने चिंता, नॉन वर्किंग विकची घोषणा, कामगारांना भर पगारी रजा
- महिला आरक्षणाविरोधात संसदेत हाणामारी करणारे मुलायमसिंग यादव धाकट्या सुनेचे तरी ऐकणार का.