प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सामरिक दूरदृष्टीवर आधारित आधीच्या केंद्र सरकारने भारताने सामरिक आणि संरक्षण धोरणे आखली असती तर भारत आत्तापर्यंत जागतिक महाशक्ती महासत्ता बनला असता, असे प्रतिपादन भारताचे माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी केले आहे. Veer Savarkar ‘s security vision which would have made India Superpower by now to students & our armed forced
राजधानी नवी दिल्लीत वरिष्ठ नौदल अधिकारी आणि नौदलाचे विद्यार्थी यांना संबोधित करताना उदय माहुरकर यांनी वीर सावरकरांची सामाजिक दूरदृष्टी अर्थात Veer
Savarkar’s security vision या विषयावर सविस्तर विवेचन केले. नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ऍडमिनल एस. एन. घोरमाडे यांनी या कार्यक्रमाचे खास आयोजन केले होते. त्यांच्या निमंत्रणावरून उदय माहुरकर यांनी “वीर सावरकरांची सामरिक दूरदृष्टी” या विषयावर वरिष्ठ नौदल अधिकारी आणि नौदल विद्यार्थ्यांची संवाद साधला.
या वेळी उदय माहूरकर म्हणाले, की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आपण फक्त क्रांतिकारक म्हणून ओळखतो. परंतु ते राष्ट्रवादी विचारवंत होते. भारतीय राष्ट्रवादाचा मूलभूत सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांच्या विचारांचा मी 1996 पासून अभ्यास केल्यावर माझ्या असे लक्षात आले, की भारताच्या सामरिक आणि संरक्षण धोरणाविषयी त्यांनी मूलभूत चिंतन केले आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे भारताने आता संरक्षण आणि सामरिक धोरणाचे पितामह यादृष्टीने पाहिले पाहिजे.
सावरकरांनी भारताच्या संरक्षण नीतीचे बारकाईने अध्ययन केले आणि अत्यंत मूलगामी महत्त्वाच्या सूचना केल्या. त्या सूचनांकडे त्यावेळीच लक्ष दिले असते, तर भारत आत्तापर्यंत जागतिक महासत्ता आणि महाशक्ती बनला असता, असे प्रतिपादन उदय माहूरकर यांनी केले. भारताने आता वीर सावरकरांची सामरिक दूरदृष्टी आत्मसात करून संरक्षण धोरणे आखली आहेत, याविषयी माहुरकर यांनी समाधान व्यक्त केले.
Veer Savarkar ‘s security vision which would have made India Superpower by now to students & our armed forced
महत्वाच्या बातम्या