• Download App
    वीर सावरकर का अपमान नही सहेगा हिंदुस्थान!!; संसदेत छत्रपतींच्या पुतळ्यासमोर शिवसेना-भाजपचे खासदार एकवटले!!| Veer Savarkar Ka Sharm Nahi Sahega Hindusthan!!; Shiv Sena-BJP MPs united in front of Chhatrapati's statue in Parliament!!

    वीर सावरकर का अपमान नही सहेगा हिंदुस्थान!!; संसदेत छत्रपतींच्या पुतळ्यासमोर शिवसेना-भाजपचे खासदार एकवटले!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर त्याचे पडसाद राजधानी दिल्लीत उमटले.Veer Savarkar Ka Sharm Nahi Sahega Hindusthan!!; Shiv Sena-BJP MPs united in front of Chhatrapati’s statue in Parliament!!

    एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या निलंबित खासदारकी भोवती एकवटून आंदोलन करत असता दुसरीकडे शिवसेना – भाजपचे खासदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जमले आणि त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयजयकार करत राहुल गांधींचा निषेध केला.



    या आंदोलनात महाराष्ट्रातले शिवसेना – भाजपचे खासदार आघाडीवर होते. त्या आंदोलनात खासदार प्रकाश जावडेकर, पुनम महाजन, धनंजय महाडिक, हेमंत गोडसे सोलापूरचे सिद्धेश्वर स्वामी, खासदार राहुल शेवाळे, अनिल बोंडे यांच्यासह सर्व खासदार सहभागी झाले होते.

    राहुल गांधींच्या समर्थनासाठी काँग्रेसच्या खासदारांनी आज अंगावर काळे कपडे परिधान करून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेना – भाजपच्या खासदारांनी सावरकरांच्या समर्थनाचे आंदोलन करून प्रत्युत्तर दिले.

    Veer Savarkar Ka Sharm Nahi Sahega Hindusthan!!; Shiv Sena-BJP MPs united in front of Chhatrapati’s statue in Parliament!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!