• Download App
    वसुधैव कुटुंबकम् ! स्पुतनिक-व्ही ची दुसरी खेप भारतात ; रशियन राजदूत म्हणाले -'रशियन-इंडियन' व्हॅक्सीन ; सिंगल डोस लस लवकरच Vasudhaiva Kutumbakam: Second batch of Russian Covid-19 vaccine Sputnik V reaches Hyderabad

    वसुधैव कुटुंबकम् ! स्पुतनिक-व्ही ची दुसरी खेप हैदराबादेत ; रशियन राजदूत म्हणाले ‘रशियन-इंडियन’ व्हॅक्सीन – भारतात लवकरच निर्मिती

    • रशियन लस स्पुतनिक-व्हीची दुसरी खेप हैदराबादला पोहोचली आहे. रशियन राजदूत एन कडाशेव यांनी त्याला रशियन-भारतीय लस असे नाव दिले असून ते म्हणाले की लवकरच स्पुतनिक लाइटच्या सिंगल डोसच्या निर्मितीवरही जोर देण्यात येईल.

    • रशियाहून लसीचे ६० हजार डोस भारतात दाखल.

    वृत्तसंस्था

    हैदराबाद: देशात फक्त दोन लसींच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविली जात आहे, परंतु लवकरच या मोहिमेमध्ये आणखी एक लसीचे नाव जोडले जाईल. आता रशियन लस स्पुतनिक-व्ही देखील पुढच्या आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होईल. आज, रशियन लस स्पुतनिक-व्ही ची दुसरी खेप हैदराबादला पोहोचली. ही लस भारतात आल्यानंतर रशियाचे राजदूत एन. कडाशेव यांनी या लसीला रशियन-भारतीय लस असे नाव दिले. ते म्हणाले की रशियन लस स्पुतनिक-व्ही च्या प्रभावावर जगभर चर्चा झाली. कोरोनाविरूद्ध स्पुतनिक-व्ही किती प्रभावी आहे याची सर्वांनाच चांगली कल्पना आहे.Vasudhaiva Kutumbakam: Second batch of Russian Covid-19 vaccine Sputnik V reaches Hyderabad

    लवकरचं लसीकरणाच्या नव्या टप्प्याला सुरूवात होत आहे. भरताला नवी रशियन कोरोना प्रतिबंधात्मक स्पुतनिक-व्ही कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी खेप दाखल झाली आहे .

    स्पुतनिक कोरोना प्रतिबंधक लस भारतात आली आहे. पुढील आठवड्यापासून बाजारात ही लस उपलब्ध होईल.

    रशियन राजदूत  यांनी अशी माहिती दिली की भारतात स्पुतनिक लाईट लस तयार करण्यावरही भर दिला जाईल.  रशियन तज्ञांनी कोरोनावर ही लस प्रभावी असल्याचे वर्णन केले आहे. रशिचयाच्या स्पुतनिक कोरोना प्रतिबंधक लसीचे जवळजवळ ६० हजार डोस हे भारतात दाखल झाले आहेत. ही लस कोरोना लढ्यात सर्वात उपयुक्त असल्याचं म्हटलं जात आहे.

    दोन बिलियन डोस हे पुढील पाच महिन्यांमध्ये भारताला उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

    पुढच्या आठवड्यापासून स्पुतनिक कोरोना प्रतिबंधक लसीची विक्री भारतात सुरू होणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यापासून भारतात या लसीचं उत्पादन होऊन लस मिळू शकणार आहे.

    डॉ. रेड्डीज लॅबरोटरीजने स्टॉक एक्सचेंजलाही स्पुतनिक व्ही या लसीच्या डोसच्या किंमतीबाबत माहिती दिली आहे. ११ ऑगस्ट २०२० रशियाने या लसीची नोंदणी केली होती. ही कोरोना विरोधातली जगभरातली पहिली लस आहे.

    स्पुतनिक कोरोना प्रतिबंधक लस ही रशियन बनावटीची लस असून या लसीच्या एका डोसची किंमत ही ९९५ रूपये असणार आहे. या डोसला सेंट्रल ड्रग्ज लॅबरोटरीजकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत.

    भारतात जेव्हा या लसीच्या निर्मितीला सुरूवात होईल तेव्हा कदाचित या लसीच्या डोसची किंमत कमी होऊ शकते.भारतात लसी तयार करणाऱ्या कंपन्यांशी या लसीच्या उत्पादनाबाबत चर्चा सुरू आहे

    Second batch of Russian Covid-19 vaccine Sputnik V reaches Hyderabad

    Related posts

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड

    मुंबईत ठाकरेच ठरले इतरांवर भारी; उमेदवारांच्या आकड्यांच्या हिशेबात मारली बाजी!!