पिलीभीतचे लोकसभा खासदार वरुण गांधी हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. खुद्द वरुण गांधी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. वरुण गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, तीन दिवस पिलीभीतमध्ये राहिल्यानंतर माझी कोरोना चाचणी अत्यंत गंभीर लक्षणांसह पॉझिटिव्ह आली आहे. Varun Gandhi Corona Positive : Varun Gandhi informed about Corona infection by tweeting
विशेष प्रतिनिधी
पिलीभीत : पिलीभीतचे लोकसभा खासदार वरुण गांधी हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. खुद्द वरुण गांधी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. वरुण गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, तीन दिवस पिलीभीतमध्ये राहिल्यानंतर माझी कोरोना चाचणी अत्यंत गंभीर लक्षणांसह पॉझिटिव्ह आली आहे.
त्यांनी पुढे लिहिले की, आम्ही तिसरी लाट आणि निवडणूक प्रचाराच्या दरम्यान आहोत. निवडणूक आयोगानेही उमेदवार आणि राजकीय कार्यकर्त्यांना खबरदारीचा डोस द्यायला हवा.
सध्या यूपीमध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. यूपीमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार असून १० मार्चला निकाल होती येणार आहेत. आयोगाने सध्या १५ जानेवारीपर्यंत प्रचारसभा किंवा रोड शोवर बंदी घातली आहे. कोरोनाच्या या नव्या लाटेत देशभरात अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटींना लागण झाली आहे.
Varun Gandhi Corona Positive : Varun Gandhi informed about Corona infection by tweeting
महत्त्वाच्या बातम्या
- धुक्यात हरवला संगमनेर तालुका..!; काश्मीर, महाबळेश्वरला आल्यासारखे पर्यटकांना वाटते
- कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक; निर्णयाकडे जनतेचे लक्ष
- India Coronavirus Update : देशात कोरोना अनियंत्रित, 24 तासांत 1 लाख 59 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 3623 जण ओमिक्रॉन बाधित