वृत्तसंस्था
बरेली – भाजपचे पिलीभीतचे खासदार वरूण गांधी यांचे केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कृषी विषयक धोरणाबाबत गंभीर मतभेद झालेले दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या समस्यांवरून वरूण गांधी यांनी आज पुन्हा एकदा योगी सरकारविरोधात निशाणा साधला आहे.Varun Gandhi again targets Yogi government; The government should pay attention to the problems of the farmers
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे, याकडे त्यांनी ट्विटरद्वारे लक्ष वेधले आहे. उत्तर प्रदेशातील शेतकरी समोध सिंह यांनी गेल्या १५ दिवसांपासून आपले धान बाजारात विकण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्याचा योग्य भाव मिळाला नाही. शेवटी त्यांनी धानाला आग लावली.
या घटनेचा विडिओ वरूण गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.याखेरीज बरेलीमधूनही त्यांनी योगी सरकारला चांगलेच सुनावले आहे. ते म्हणाले, की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. मी काही भ्रष्टाचार केलेला नाही. पण मला काही नेते माहिती आहेत,
की जे पोलीसांकडून, खाण मालकांकडून पैसे घेतात. मी खासदाराचे वेतन घेत नाही आणि सरकारी घरातही राहात नाही. जनतेने मला अधिकार दिले आहेत ते स्वतःची प्रगती साधण्यासाठी नव्हे, तर जनतेची सेवा करण्यासाठी आणि जनतेची प्रगती साधण्यासाठी, हे मी कायम लक्षात ठेवतो, असा टोला देखील खासदार वरूण गांधी यांनी योगी सरकारला लगावला आहे.
Varun Gandhi again targets Yogi government; The government should pay attention to the problems of the farmers
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election 2022 : प्रियांका गांधींची मोठी घोषणा, उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास मुलींना देणार स्मार्टफोन आणि स्कूटी
- पाकिस्तानात वाढत्या महागाईमुळे विरोधक उतरले रस्त्यावर, जुलमी इम्रान सरकारपासून सुटका मिळण्याची मागणी
- सर्वोच्च न्यायालयाचे CJI रमण्णा यांनी कायदामंत्र्यांसमोरच पायाभूत सुविधांवर केला सवाल, म्हणाले – ‘न्यायालयांसाठी उत्तम पायाभूत सुविधा ही फक्त एक कल्पना!’
- महागाईचा परिणाम : 14 वर्षांनंतर वाढणारे आगपेटीचे दर, एका झटक्यात दुप्पट होणार किंमत