• Download App
    वाराणसी कोर्टाचा फैसला; कोर्ट कमिशनर हटवणार नाहीत; मशिदीचे तळघरासह 17 मे च्या आत पूर्ण सर्वेक्षण अपेक्षित!!Varanasi court decision; Court commissioners will not be removed; A complete survey of the basement of the mosque is expected by May 17

    ज्ञानवापी मशीद : वाराणसी कोर्टाचा फैसला; कोर्ट कमिशनर हटवणार नाहीत; मशिदीचे तळघरासह 17 मे च्या आत पूर्ण सर्वेक्षण अपेक्षित!!

    वृत्तसंस्था

    वाराणसी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीसंदर्भात वाराणसी कोर्टाने अत्यंत महत्त्वपूर्ण फैसला देत मुस्लिम पक्षाची मागणी फेटाळून लावली आहे. कोर्ट कमिशनर अजय कुमार मिश्रा यांना हटवणार नाही, उलट त्यांच्यासोबत अन्य 2 कोर्ट कमिशनर नेमले जातील, असे वाराणसी कोर्टाने स्पष्ट केले आहे. Varanasi court decision; Court commissioners will not be removed; A complete survey of the basement of the mosque is expected by May 17

    त्याच बरोबर येत्या 17 मे रोजी म्हणजे अजून 5 दिवसात ज्ञानवापी मशिदीचे तळघरासह सर्व सर्वेक्षण व्हिडिओग्राफी द्वारे पूर्ण करण्याचे आदेशही वाराणसी कोर्टाने दिले आहेत. व्हिडिओग्राफी सर्वेक्षणात जे कोणी अडथळा आणतील त्यांच्यावर ताबडतोब एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, असे आदेशही कोर्टाने उत्तर प्रदेश सरकार आणि वाराणसी प्रशासनाला दिले आहेत.

    कोर्ट कमिशनर अजय कुमार मिश्रा हे पक्षपाती आहेत, असा दावा मुस्लिम पक्षाने कोर्टात केला होता. मात्र, आपले सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले नाही. आपण त्याचा अहवालही सादर केलेला नाही, तर आपल्यावर पक्षपाताचा आरोप कसा लावू शकतात?, असा सवाल अजय कुमार मिश्रा यांनी कोर्टात केला. तो कोर्टाने ग्राह्य ठरवत अजय कुमार मिश्रा यांना कोर्ट कमिशनर पदावरून हटविण्याची मुस्लिम पक्षाची मागणी फेटाळून लावली आहे.


    ASI Survey : ज्ञानवापी मशिदीसह देशभरातील 10 प्रमुख मशिदींच्या पुरातत्त्व सर्वेक्षणाची गरज!!


    त्याच बरोबर ज्ञानवापी मशिदीतील तळघर खोलून तिथल्या सर्वेक्षणाचा देखील माहिती अहवाल कोर्टाला सादर करण्याचे महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. यापुढे अजय कुमार मिश्रा यांच्या बरोबरच विशाल कुमार सिंह आणि अजय सिंह हे दोन कोर्ट कमिशनर ज्ञानवापी मशिदीचे आणि तळघराचे सर्वेक्षण करतील. या तिघांचा अहवाल 17 मे रोजी कोर्टात सादर करण्यात येईल आणि त्यानंतर कोर्ट निर्णय देणार आहे.

    अंजुमन इंतजामियां मस्जिद कमिटीने एडवोकेट कमिश्नर अजय कुमार मिश्रा हे पक्षपाती असल्याचा आरोप करून त्यांना हटविण्याची मागणी केली होती. परंतु या मुद्द्यावर 3 दिवस कोर्टात युक्तिवाद होऊन सीनियर सिव्हिल जज रवी कुमार दिवाकर यांनी 11 मे रोजी आपला फैसला सुरक्षित ठेवला होता. तो आज त्यांनी दिला आहे.

    – वाराणसी कोर्टाचा फैसला असा :

    •  कोर्ट कमिशनर अजय कुमार मिश्रा यांना हटवणार नाही.
    •  त्यांच्याबरोबर विशाल कुमार सिंह आणि अजय कुमार सिंह हे दोन कोर्ट कमिशनर असतील.
    •  17 मे पर्यंत ज्ञानवापी मशीद आणि तिच्या तळघराचे व्हिडीओग्राफी सर्वेक्षण करून अहवाल सादर करायचा आहे.

    Varanasi court decision; Court commissioners will not be removed; A complete survey of the basement of the mosque is expected by May 17

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य