• Download App
    राज्यांमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण अजूनही जास्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली चिंता|Vaccine wastage is still high in the states, Prime Minister Narendra Modi has expressed concern

    राज्यांमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण अजूनही जास्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली चिंता

    राज्यांमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण अद्यापही खूप जास्त आहे. ते कमी करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.Vaccine wastage is still high in the states, Prime Minister Narendra Modi has expressed concern


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राज्यांमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण अद्यापही खूप जास्त आहे. ते कमी करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

    लस उत्पादन कंपन्यांना युनिट्स वाढवण्यासह आर्थिक पाठबळ आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी सरकार मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांमधील लसीच्या अपव्ययाचा आढावा घेतला.



    राज्यांमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण अजूनही खूप आहे अशी चिंता व्यक्त करत ते कमी करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे.लसींची उपलब्धता आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठीच्या ‘रोडमॅप’ची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली.

    लसींच्या उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी वेगवगेळ्या लस उत्पादकांना मदत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली. भारत सरकार लस उत्पादक कंपन्यांसोबत मिळून काम करत आहे.

    लस उत्पादनासाठी कंपन्यांनी आणखी प्लांट उभारण्यासाठी, कच्च्या मालाचा पुरवठा आणि आर्थिक पाठबळ देत आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली.

    देशातील ४५ वर्षांवरील आणि १८ ते ४४ वर्षांदरम्यानचे नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना देण्यात येत असलेल्या लसीकरणाचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. लसीकरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आलीआहे.

    संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल, माहीत आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

    Vaccine wastage is still high in the states, Prime Minister Narendra Modi has expressed concern

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण