केंद्र सरकारकडून ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मोफतच दिली जाणार आहे. राज्यांनीही केंद्राकडून लस घेतल्यास मोफत मिळणार असेल, असे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.Vaccine is free for all above 45 years from the Central Government, politics of vaccine price from the State
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मोफतच दिली जाणार आहे. राज्यांनीही केंद्राकडून लस घेतल्यास मोफत मिळणार असेल, असे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारसाठी लसीचा एक दर आणि राज्य सरकारे व खासगी रुग्णालये यांच्यासाठी मात्र वेगवेगळे दर, या मुद्यावरून राज्य सरकारकडून राजकारण केले जात आहे. केंद्र सरकारतर्फे यासंदर्भात खुलासा करण्यात आला. मात्र, त्यात फक्त राज्यांनी केंद्राकडून लस घेतल्यास त्यांना ती मोफत मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे शनिवारी लस दरासंदर्भात ट्विट करण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे की, हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे की, कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी केंद्राला १५० रुपये प्रतिमात्रा या दराने मिळत आहेत. या दोन्ही लसी राज्यांनी केंद्राकडून घेतल्या तर त्या त्यांना मोफत मिळतीले.
१ मेपासून लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू होत असून, १८ वर्षांपुढील सर्व व्यक्तींना लस घेता येणार आहे. केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर कोविशिल्ड लसीचे निर्माते असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटने लस दर जाहीर केले.
त्यानुसार राज्य सरकारांना कोविशिल्डसाठी ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रतिमात्रा मोजावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. सीरमच्या या दरपत्रकानंतर राज्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. लस दरांबाबत हा भेदभाव का, असा सवाल व्यक्त करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ४५ वर्षांपुढील व्यक्तींना सरकारी आरोग्य केंद्रातून लस मोफत मिळणार असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे.
Vaccine is free for all above 45 years from the Central Government, politics of vaccine price from the State
महत्त्वाच्या बातम्या
- लसीच्या दरांबद्दलच्या सर्व शंका केंद्र सरकारने केल्या दूर, 150 रुपयांत लस घेऊन राज्यांना पुढेही मोफतच देणार
- Delhi Oxygen Crisis : ऑक्सिजनअभावी दिल्लीत 20 जणांचा मृत्यू, 200 पेक्षा जास्त रुग्णाचा जीव टांगणीला
- Inspiring : कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी गुरुद्वाराचा पुढाकार, ‘ऑक्सिजन लंगर’मुळे वाचताहेत हजारोंचे प्राण
- एन. व्ही. रमना बनले ४८वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास
- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण, तिहारच्या हाय सिक्युरिटी तुरुंगात कैद आहे कुख्यात गँगस्टर