• Download App
    कोरोनाविरुध्द लढण्यासाठी लसीकरण प्रभावी, ७२ टक्के भारतीयांचा विश्वास|Vaccination effective against corona, 72% of Indians believe

    कोरोनाविरुध्द लढण्यासाठी लसीकरण प्रभावी, ७२ टक्के भारतीयांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाविरुध्द लढण्यासाठी कोविड-१९ लस ही सुरक्षित आणि प्रभावी आहे असा विश्वास ७२ टक्के नागरिकांनी व्यक्त केला आहे. पब्लिक की आवाज सर्व्हेमधून ही माहिती पुढे आली आहे. भारतातील केवळ ८.८ टक्के नागरिकांनी लसीकरणाला विरोध केला आहे. त्यातील २५ टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.Vaccination effective against corona, 72% of Indians believe

    जानेवारी 2021 मध्ये, भारताने आपल्या जवळजवळ 90 कोटी पात्र लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी जगातील सर्वात मोठी कोविड -19 लसीकरण मोहीम सुरू केली.एकूण 65 कोटींपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत. तथापि, केंद्र सरकारने ठरवलेल्या 31 डिसेंबरपर्यंत संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे लक्ष्य साध्य करण्यापूर्वी आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.



    लसीकरणाला विरोध आहे का हे तपासण्यासाठी पब्लिक की आवाज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सर्व्हे केला. त्याला नऊ लाखांहून अधिक नागरिकांनी प्रतिसाद दिला.
    लस घेणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे ७२ टक्के लोकांनी मान्य केले आहे. त्यातील ६० टक्के नागरिकांचा विश्वास आहे की भारतीय लसी विदेशी कोविड -19 लसींच्इतक्याच प्रभावी आहेत.

    बहुसंख्य नागरिकांनी लस घेण्यास तयारी दर्शविली असली तरी त्यातील १८ टक्के नागरिकांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यातील ८.८ टक्के नागरिकांनी लस घ्यायचीच नाही असे ठरविले आहे. चार टक्के नागरिकांनी लसीचा काहीही उपयोग नाही म्हणत लस घेण्यास नकार दिला आहे.

    लसीकरण न करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यामुळे दुष्परिणाम होण्याची भीती असल्याचे ३४ टक्के लोकांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार लसीचे सौम्य आणि अल्पकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. अगदी क्वचित प्रसंगी गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

    लसीवर विश्वास नसल्याचे २० टक्के लोकांचे म्हणणे आहे. १४ टक्के लोकांना आरोग्याची चिंता आहे. त्यातील ११ टक्के लोकांनी आत्तापर्यंत कधीही लस घेतलेली नाही.लस घेतल्यामुळे कोरोना झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. त्याचबरोबर मृत्यूची भीतीही नाही, असे बहुसंख्याकांनी म्हटले आहे. त्यापैकी २४ टक्के लोक म्हणाले त्यांचे मित्र आणि कुटुंबियांनी सांगितल्यामुळे लसीवर विश्वास बसला आहे. २५ टक्के लोकांचा विश्वास डॉक्टरांमुळे आहे.

    लसीकरणाबाबत आपल्या विविध माध्यमांतून माहिती मिळते असे ५९ टक्के लोकांनी म्हटले आहे. १५ टक्के लोकांनी सरकारी जाहिरातींद्वारे माहिती मिळत असल्याचे सांगितले आहे. १३ टक्के लोकांना मित्र आणि कुटुंबियांकडून माहिती मिळते तर ११ टक्के लोकांनी म्हटले आहे की दुसºया माध्यमातून माहिती मिळते.

    Vaccination effective against corona, 72% of Indians believe

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते