विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अठरा वर्षांखालील मुलांचे देखील लवकरच लसीकरण सुरू होऊ शकते, यासाठीच्या लशींच्या रुग्णालयांतील चाचण्या आता पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दिली.vaccinae will available for children in coming days
यासाठीचा सगळा कायदेशीर आराखडा हा सरकारी पातळीवर तयार करण्यात येईल, तज्ज्ञांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतरच लहान मुलांचे देखील लसीकरण करण्यात येईल, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने वेगाने पावले उचलायला सुरुवात केली आहे.
यावर मुख्य न्या. डी. एन. पटेल आणि न्या. ज्योती सिंह यांच्या खंडपीठाने आधी चाचण्या पूर्ण होऊ द्या, या चाचण्यांशिवाय लस देण्यात आली तर मोठे संकट निर्माण होईल असे सांगितले. एकदा या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर सरकारने देखील तातडीने मुलांचे लसीकरण करावे, अवघा देश याची वाट पाहतो आहे, असे न्यायालयाने नमूद केले. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी होईल.
vaccinae will available for children in coming days
महत्त्वाच्या बातम्या
- ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी RSS मध्ये जा, कोणत्या नेत्याबद्दल म्हणाले राहुल गांधी?
- Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेवर कोरोनाचं सावट, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ऑलिम्पिक व्हिलेजमधील एकाला लागण
- Ashadhi Wari : पंढरपुरात संचारबंदी, आंतरजिल्हा नाकेबंदीही कडक, इतर जिल्ह्यातून पंढरपुरात एकही एसटी बस न सोडण्याचे महामंडळाचे आदेश
- राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेते, आमचे शिवसेनेशीही वैर नाही; चंद्रकांत पाटील यांचे यूतीबाबत सूचक वक्तव्य