• Download App
    उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, बद्रीनाथसह 51 मंदिरे सरकारी ताब्यातून मुक्त; विहिंपने म्हटले - इतर राज्यांनीही असे करावे अन्यथा आंदोलन । Uttarakhand CM Tirath Singh Rawat released 51 Temples From Control Of Devasthanam Board

    उत्तराखंडचा मोठा निर्णय, बद्रीनाथसह ५१ मंदिरे सरकारी ताब्यातून मुक्त; विहिंपने म्हटले – इतर राज्यांनीही असे करावे अन्यथा आंदोलन

    Uttarakhand CM Tirath Singh Rawat : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी सत्ता सांभाळल्यावर अवघ्या एक महिनाभरात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उत्तराखंडच्या साधूसंतांना एक मोठी भेट दिली आहे. मागच्या त्रिवेंद्रसिंह रावत सरकारच्या निर्णयाला तीरथसिंह यांनी उलटवून देवस्थानम बोर्डामधून 51 मंदिरे मुक्त केली. या निर्णयाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. ही मागणी यापूर्वीच देशभर विशेषत: दक्षिण राज्यांत वाढत आहे. अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांच्याशी देशाचा इतिहास जोडलेला आहे. कोट्यवधी रुपयांचा व्यवहार या मंदिर व्यवस्थापनांही जोडलेला आहे. Uttarakhand CM Tirath Singh Rawat released 51 Temples From Control Of Devasthanam Board 


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी सत्ता सांभाळल्यावर अवघ्या एक महिनाभरात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उत्तराखंडच्या साधूसंतांना एक मोठी भेट दिली आहे. मागच्या त्रिवेंद्रसिंह रावत सरकारच्या निर्णयाला तीरथसिंह यांनी उलटवून देवस्थानम बोर्डामधून 51 मंदिरे मुक्त केली. या निर्णयाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. ही मागणी यापूर्वीच देशभर विशेषत: दक्षिण राज्यांत वाढत आहे. अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांच्याशी देशाचा इतिहास जोडलेला आहे. कोट्यवधी रुपयांचा व्यवहार या मंदिर व्यवस्थापनांही जोडलेला आहे.

    मंदिरे सरकारी कब्जातून मुक्त व्हावीत यासाठी साधूसंतांनी यापूर्वी आंदोलने केलेली आहेत. याबाबत प्रमुख पुरोहितांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. यावर सरसंघचालकांनी त्यांना आश्वासन दिले होते. ते म्हणाले होते की, जर मशिदी आणि चर्चवर सरकारचे नियंत्रण नाही, तर मग मंदिरांवर कसे असू शकेल? हे तर चुकीचेच आहे.

    दुसरीकडे, मुख्यमंत्री तीरथसिंह रावत म्हणाले की, 9 एप्रिल रोजी झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये या मंदिरांच्या मुक्ततेवर चर्चा झाली नाही, कारण या बैठकीतील मुद्दे आधीपासूनच निश्चित होते. पढे होणाऱ्या बैठकीत यावर निश्चित चर्चा होईल.

    मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्या निर्णयानंतर आता विश्व हिंदू परिषदेनेही इतर राज्यांनीही उत्तराखंडचा कित्ता गिरवण्याचे आवाहन केले आहे. विहिंपने इशारा दिलाय की, मंदिरे सरकारी ताब्यातून मुक्त झाली नाहीत तर मोठे आंदोलन छेडण्यात येईल.

    मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर मागच्या महिनाभरात तीरथसिंह रावत यांनी आधीच्या सरकारचे अनेक निर्णय फिरवले आहेत. काही वादग्रस्त निर्णयांमुळे त्रिवेंद्रसिंह रावत यांना राजीनामा द्यावा लागला होता. यात मुख्य मुद्दा हा मंदिरांना सरकारी ताब्यात ठेवण्याचा होता. दुसरीकडे, पवित्र तीर्थक्षेत्र ऋषिकेशमध्ये महसूलवाढीसाठी दारूचे दुकाने उघडण्याचाही निर्णय आधीच मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. आताच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र साधूसंतांची ऋषिकेशमधील दारूची दुकाने बंद करण्याची मागणी मान्य केली आहे.

    Uttarakhand CM Tirath Singh Rawat released 51 Temples From Control Of Devasthanam Board

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य