• Download App
    उत्तराखंड : हल्दवानी तुरुंगात ४४ कैदी ‘एचआयव्ही’ पॉझिटिव्ह आढळले Uttarakhand 44 prisoners found HIV positive in Haldwani jail

    उत्तराखंड : हल्दवानी तुरुंगात ४४ कैदी ‘एचआयव्ही’ पॉझिटिव्ह आढळले

    एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळलेल्या कैद्यांमध्ये एका महिला कैद्याचाही समावेश आहे.

    विशेष प्रतिनिधी

    उत्तराखंडमधील हल्दवानी तुरुंगातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कारागृहात बंदिस्त ४४ कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळलेल्या कैद्यांमध्ये एका महिला कैद्याचाही समावेश आहे. Uttarakhand 44 prisoners found HIV positive in Haldwani jail

    सुशीला तिवारी हॉस्पिटलचे एआरटी सेंटर इन्चार्ज डॉ. परमजीत सिंग यांनी सांगितले की, कारागृहात एचआयव्ही पॉझिटिव्ह कैद्यांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे तुरुंग प्रशासनाची चिंता वाढली आहे.

    कैद्यांवर उपचाराबाबत माहिती देताना डॉ.सिंग म्हणाले की, एचआयव्ही रुग्णांसाठी अँटीरेट्रोव्हायरल थेरपी सेंटर सुरू करण्यात आले असून, तेथे बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. माझी टीम तुरुंगातील कैद्यांची सतत चाचणी घेत आहे. एचआयव्ही बाधित कैद्याला मोफत उपचार आणि औषधे दिली जात आहेत. या कैद्यांना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपचार दिले जात आहेत.

    Uttarakhand 44 prisoners found HIV positive in Haldwani jail

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही