• Download App
    नमाज झाल्यावर पॅलेस्टाईनचे ध्वज फडकाविण्याचे आवाहन, उत्तर प्रदेशातील तरुणाला अटक|Uttar Pradesh youth arrested for calling for waving Palestinian flag after prayers

    नमाज झाल्यावर पॅलेस्टाईनचे ध्वज फडकाविण्याचे आवाहन, उत्तर प्रदेशातील तरुणाला अटक

    इस्त्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष थांबला असला तरी काह समाजघटकांना भडकाविण्याचे प्रयत्न सुरूच आहे. उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील एका तरुणाने आपल्याा फेसबुकवर नमाज झाल्यावर पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवा असे आवाहन केले. पोलीसांनी दोन समाजात तेढ पसरविण्याच्या आरोपावर त्याला अटक केली आहे.Uttar Pradesh youth arrested for calling for waving Palestinian flag after prayers


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : इस्त्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष थांबला असला तरी समाजघटकांना भडकाविण्याचे प्रयत्न सुरूच आहे. उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील एका तरुणाने आपल्याा फेसबुकवर नमाज झाल्यावर पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवा असे आवाहन केले.

    पोलीसांनी दोन समाजात तेढ पसरविण्याच्या आरोपावर त्याला अटक केली आहे.यासीर अख्तर असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबियांनी दावा केला आहे की ही पोस्ट भारतासाठी नव्हे तर गाझासाठी होती.



    वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुधीर कुमार सिंग यांनी सांगितले ही यासीन हा एक फेसबुक पेज चालवित होता. या पेजच्या माध्यमातून तो अनेकदा मेसेज व्हायरल करायचा. शुक्रवारी नमाज झाल्यावर आपल्या गाड्यांवर आणि घरांवर पॅलेस्टाईनचा ध्वज फडकाविण्याचे आवाहन केले.

    हा संपूर्ण मुस्लिमबहुल परिसर आहे. त्यामुळे या प्रकारच्या भडकाऊ मेसेजमुळे हिंसाचाराची भीती होती. नमाजासाठी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम एकत्र येत असल्याने ही गर्दी भडकण्याची भीती होती.

    त्याला जर झेंडा फडकावयचा असेल तर ठिक आहे परंतु या प्रकारचे आवाहन करणे योग्य नाही. अनेकांनी त्याच्या या मेसेजला विरोध केला होता.
    अख्तरच्या भावाने सांगितले

    की १९ मे रोजी यासीरने पॅलेस्टाईनबाबतच्या काही बातम्या फेसबुकवर टाकल्या आणि आवाहन केले की शुक्रवारच्या नमाजानंतर आपल्या घरांवर आणि वाहनांवर पॅलेस्टाईनचा ध्वज फडकाविण्याचे आवाहन केले.

    त्यानंतर फेसबुकवर अनेकांनी त्याला विरोध केला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपण मेसेजमध्ये गाझा शब्द लिहिण्यास विसरला आहे. त्यामुळे त्याने नंतर तशी सुधारणाही केली.

    Uttar Pradesh youth arrested for calling for waving Palestinian flag after prayers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र