या मैत्रीची सर्वत्र चर्चा होत होती; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण
विशेष प्रतिनिधी
रायबरेली : मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये, मोहम्मद आरिफ यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील त्यांच्या मंधका गावात सापडलेला एक जखमी अवस्थेतील सारस पक्षी घरी आणला होता. त्यानंतर पुढच्या तेरा महिन्यांत त्यांनी त्याची काळजी घेतली. यामुळे हा पक्षी आणि आरीफ यांची चांगली मैत्री झाली होती, या मैत्रीची सर्वत्र चर्चा होत होती. मात्र या मैत्रीचा शेवट अखेर विचित्र पद्धतीने झाला. शनिवारी आरीफ यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सारस हा उत्तर प्रदेशचा राजकीय पक्षी आहे. Uttar Pradesh Strange end to human bird friendship After bringing home an injured sarus crane
वन्यजीव अधिकाऱ्यांनी मंगळवारी आरिफच्या घरातून रायबरेली अभयारण्यामध्ये सारस पक्षाला हलवल्यामुळे, या मानव-पक्षी मैत्रीचा उलगडा आणि शेवटही झाला. त्यानंतर आता हा सारस पक्षी कानपूरच्या प्राणीसंग्रहालयात आहे.
सारस सामान्यतः आर्द्र प्रदेशात आढळतो, हा उत्तर प्रदेशचा राज्य पक्षी आहे आणि १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची ३ अंतर्गत संरक्षित आहे. ते जगातील सर्वात उंच उडणारे पक्षी आहेत.
आरिफने सांगितले की त्याला एका शेतात पाय तुटलेला नर सारस पक्षी सापडला. “मी त्याला घरी आणला आणि त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. मी जखमेवर हळद आणि मोहरीच्या तेलाची पेस्ट लावली आणि पायाला आधार देण्यासाठी एक काठी बांधली. आम्ही आमच्या कोंबड्यांसाठीही तेच करतो.”
आरीफ यांनी सांगितले की ‘’त्यांनी त्या पक्षाला कधीच बंदिस्त ठेवले नाही. “काही आठवड्यांतच पक्षी बरा होऊ लागला आणि लवकरच तो उडू लागला आणि घराबाहेरील अंगणातच त्याने मुक्काम केला. आरीफ जेव्हा मोटारसायकलवरून गावात जायचे, तेव्हा हा पक्षी त्यांचा पाठलाग करायचा, हवे तेव्हा जंगलात जायचा आणि संध्याकाळी पुन्हा घरी यायचा, माझ्यासोबत जेवायचा.’’
Uttar Pradesh Strange end to human bird friendship After bringing home an injured sarus crane
महत्वाच्या बातम्या
- ‘नमो’ शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- राहुल गांधींच्या अपात्रतेप्रकरणी नितीश कुमारांच्या मौनावर गिरीराज सिंह यांचा टोला, म्हणाले…
- राहुल गांधी हार्वर्ड – केंब्रिजचे पोस्ट ग्रॅज्युएट, पण त्यांना पप्पू बनविले; प्रियांका गांधींचा दावा; पण निवडणूक प्रतिज्ञापत्रात डिग्रीचा उल्लेखही नाही
- अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची 28 मार्चला INS चिल्का युद्धनौकेवर पासिंग आऊट परेड