• Download App
    उत्तर प्रदेश पोलीसांची गुंडांच्या मालमत्तेवर टाच, १८४८ कोटी रुपयांची मालमत्ता टाच|Uttar Pradesh police seize property of criminals worth Rs 1,848 crore

    उत्तर प्रदेश पोलीसांची गुंडांच्या मालमत्तेवर टाच, १८४८ कोटी रुपयांची मालमत्ता टाच

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशातील गुंडगिरी संपविण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने गुंडांच्या मालमत्तेवर टाच आणण्यास सुरूवात केली आहे.आत्तापर्यंत गुंडांच्या मालकीची 1,848 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे कारण त्याने गेल्या चार वर्षांत गँगस्टर कायद्यानुसार 43,294 गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले आहेत.Uttar Pradesh police seize property of criminals worth Rs 1,848 crore

    20 मार्च 2017 ते 20 जून 2021 दरम्यान 139 गुन्हेगार एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले आहेत. कायद्याच्या तरतुदींनुसार, गुन्हेगारीतून मिळवलेली मालमत्ता पोलिस जप्त करू शकतात. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की जुलै आणि ऑगस्टमध्ये मुख्तार अन्सारी टोळीच्या 248 सदस्यांवर कारवाई करण्यात आली आणि विविध जिल्ह्यात 222 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.



    या टोळीच्या 160 सदस्यांना अटक केली आहे आणि 121 इतरांवर एफआयआर नोंदवला आहे. 163 गुंडांचे शस्त्र परवाने निलंबित करण्यात आले आणि 110 जणांवर गुंड कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.साबरमती कारागृहात असलेला आणखी एक गुंड याच्या टोळीच्या 65 गुंडांवर कारवाई करण्यात आली आहे.

    त्यांच्याकडून 350 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. गुन्हेगार सुंदर भाटीच्या नऊ साथीदारांची 63 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. गुंड कुंटू सिंहच्या 24 सहयोगींची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

    मुझफ्फरनगरचे संजीव उर्फ जीवा, लखनौचे बबलू श्रीवास्तव, सुंदर भाटी आणि नोएडाचे सिंहराज भाटी यांना जन्मठेपेची शिक्षा मिळावी यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. याशिवाय, 549 इतर गुन्हेगारांची ओळख पटली आणि त्यांच्याविरुद्ध 221 एफआयआर दाखल करण्यात आले. तब्बल 255 जणांना अटक करण्यात आली आहे.

    Uttar Pradesh police seize property of criminals worth Rs 1,848 crore

    महत्त्वाच्या बातम्या

    विमान प्रवास महागणार, दरांत ९ ते १२ टक्के वाढ होणार, मुंबई- दिल्ली प्रवासाठी लागणार किमान पाच हजार

    पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी काशी विश्वनाथ धाम प्रकल्प २०२२ पूर्वीच होणार पूर्ण

    अफगणिस्थानला आपल्या नशीबावर सोडून गेलेली अमेरिका त्यांच्या नागरिकांसाठी पुन्हा सैन्य पाठविणार

    छगन भुजबळ अडचणीत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेच दोषमुक्तीच्या अर्जाला केला विरोध

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!