• Download App
    उत्तर प्रदेश : माफीया मुख्तार अन्सारीच्या आमदार मुलाच्या घरावर बुलडोझर Uttar Pradesh Mafia Mukhtar Ansari MLA sons house demolished

    उत्तर प्रदेश : माफीया मुख्तार अन्सारीच्या आमदार मुलाच्या घरावर बुलडोझर!

    अब्बास अन्सारी मनी लाँड्रिग प्रकरणात मागील तीन महिन्यांपासून तुरुंगात आहेत.

    प्रतिनिधी

    Mukhtar Ansari News: उत्तर प्रदेशातील मऊ पोलिसांनी शनिवारी बांदा तुरुंगातील माफिया व माजी आमदार मुख्तार अन्सारीचा मुलगा आमदार अब्बास अन्सारी आणि उमर अन्सारीचे दोन मजली घर पाडले.  या घराचा नकाशा अधिकृतरित्या स्वीकृत केलेला नव्हता. पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून अवैध बांधकामांवर कारवाईचे सत्र सुरू आहे.Uttar Pradesh Mafia Mukhtar Ansari MLA sons house demolished

    पोलीस क्षेत्रअधिकारी अभय सिंह यांनी प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, घर पाडण्याची कारवाई शुक्रवारी सुरू झाला आणि शनिवारी ती पूर्ण करण्यात आली. ज्या जागेवर अब्बास आणि त्यांचे भाऊ उमर यांचे घर होते, ती जागा दुसऱ्यांची होती. घराचा नकाशाही अधिकृत करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शुक्रवारी घर उध्वस्त करण्याची कारवाई सुरू झाली. मऊ जिल्हा मुख्यालयाच्या दक्षिण टोला ठाणे क्षेत्रांतर्गत जहांगीराबाद भागात ही इमारत पाडण्यात आली.

    तुरुंगात आहे अब्बास अन्सारी –

    गँगस्टरचा नेता बनलेला मुख्तार अन्सारीचा मुलगा आणि मऊ येथून सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे आमदार अब्बास अन्सारी मनी लाँड्रिग प्रकरणात मागील तीन महिन्यांपासून तुरुंगात आहेत. अब्बास अन्सारीला अशातच चित्रकूट जिल्हा तुरुंगातून कासंगज जिल्हा तुरुंगात हलवले आहे.

    अब्बास अन्सारी मागील काही दिवसांमध्ये तेव्हा चर्चेत आला होता, जेव्हा पत्नी निकहत अन्सारीशी तो तुरुंगात लपून भेटत असल्याचे समोर आले. या प्रकरणी तुरुंग अधीक्षकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. आतापर्यंत तुरुंग उपाधीक्षक, कारागृह अधीक्षक अशोक कुमार सागर, जेल संतोष कुमार यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांची चौकशी सुरू आहे.

    Uttar Pradesh Mafia Mukhtar Ansari MLA sons house demolished

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!