वृत्तसंस्था
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत उत्तर प्रदेश पहिले असून दिल्ली, कर्नाटक यांचा क्रमांक अनुक्रमे दुसऱ्या, तिसरा आल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत सांगितले. Uttar Pradesh leads in procurement of electric vehicles; Delhi is second and Karnataka is third
भारतात गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी मोठ्या प्रमाणात लॉन्च झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक मागणी उत्तर प्रदेशात आहे.
राज्यसभेत एका लेखी उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, “भारतात ८,७०,१४१ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली. उत्तर प्रदेशात २,५५,७०० त्यानंतर दिल्ली १,२५,३४७ आणि कर्नाटक ७२,५४४ वाहनांची नोंद झाली. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर बिहार आणि महाराष्ट्र आहे.
बिहारमध्ये ५८,०१४ आणि महाराष्ट्रात ५२,५०६ गाड्यांची नोंद झाली आहे.” “पेट्रोल डिझेलचा वापर कमी व्हावा या उद्देशाने देशात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी २०१५ मध्ये फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया योजना तयार केली आहे.”, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.
Uttar Pradesh leads in procurement of electric vehicles; Delhi is second and Karnataka is third
महत्त्वाच्या बातम्या
- पांढर्या सोन्याला शेवगावमध्ये झळाळी; उत्पादन कमी, दरवाढीने शेतकरी मालामाल
- आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी;कोरोना, ओमायक्रोन पार्श्वभूमीवर निर्णय
- पहिलीचे चार विषय आत एकाच पुस्तकमध्ये ; विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं होणार कमी
- पुण्यात गॅस सिलिंडर भरताना स्फोट; दोन जण ६० टक्के भाजले