• Download App
    भाजप मधून गळतीचे इंगित काय??; तिकीट कापण्यापूर्वीच पळायचे दुसरे काय...!!UTTAR PRADESH ELECTION 2022

    उत्तर प्रदेश निवडणूक : भाजप मधून गळतीचे इंगित काय??; तिकीट कापण्यापूर्वीच पळायचे दुसरे काय…!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन एक बडे नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि आणखी एक मंत्री दारासिंह चौहान राजकीय खळबळ उडवून दिली असली तरी त्या पलिकडे जाऊन भाजपमधल्या अंतर्गत राजकारणाचा आढावा घेतल्यानंतर नंतर मौर्य, चौहान आणि अन्य मंत्री, आमदारांच्या यांच्या राजीनाम्यामागचे नेमके इंगित लक्षात येते…!! UTTAR PRADESH ELECTION 2022

    स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मुलासाठी भाजपकडे तिकीट मागितले होते. परंतु त्यांना आधीच ते नाकारण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मुलगा उत्कर्षित मौर्य अशोक याने याबाबत खुलासा केला. त्याचबरोबर स्वामी प्रसाद यांनी आपल्या काही समर्थकांना देखील तिकिटे मागितली होती. परंतु उत्कर्षित मौर्य अशोक आणि त्यांच्या समर्थकांना आधीच्या निवडणुकीत यश मिळालेले नाही. हा मुद्दा भाजपच्या नेतृत्वाने लक्षात घेतला आणि नेतृत्वाने स्वामी प्रसाद यांना मुलाला आणि त्यांच्या समर्थकांना तिकिटे देता येणार नाहीत असे स्पष्ट कळवले. या पार्श्‍वभूमीवर खरे म्हणजे स्वामी प्रसाद मौर्य यांच्याकडे राजकीय बंडखोरी करण्याखेरीज पर्यायच उरला नाही. त्यामुळे ते भाजपमधून बाहेर पडले.



    स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातले नेमके किती मंत्री आपल्या नातेवाईकांना मुलांना अथवा निकटवर्तीय समर्थकांना तिकिटे मागत आहेत, याचा आढावा घेतला आहे. भाजपने प्रभावी नेत्यांच्या मुलांना अपवाद वगळता तिकिटे नाकारलेली आहेत. कल्याण सिंग यांचे चिरंजीव राजेंद्रसिंग हे एटा मधून खासदार आहेत आणि राजनाथ सिंग यांचे चिरंजीव आमदार आहेत. मात्र बाकीच्या नेत्यांना बाकीच्या नेत्यांच्या मुलांना भाजप नेतृत्व तिकीट देण्यास फारसे खूश नाही, असे मानले जात आहे.

    त्यामुळे भाजपमधून बाहेर पडताना अनेक नेते सामाजिक न्यायाचे कारण देत असले तरी प्रत्यक्षात आपल्या निकटवर्तीयांना आणि समर्थकांना तिकीटे मिळणार नाहीत याची खात्री पटल्यामुळे त्यांना राजकीय बंडखोरी करण्यावाचेन दुसरा पर्याय उरलेला नाही हेच स्पष्ट होत आहे. त्यातून मंत्री आणि काही मंत्री आणि आमदार भाजपमधून राजीनामा देऊन बाहेर पडत आहेत.

    – 70 ते 80 आमदार धोक्यात

    उत्तर प्रदेशातील प्रस्थापितविरोधी अर्थात अँटी इन्कंबन्सी मत लक्षात घेता भाजपमध्ये साधारण 70 ते 80 विद्यमान आमदारांवर देखील टांगती तलवार आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत 403 जागांपैकी भाजपचे 338 आमदार आहेत. यापैकी 70 ते 80 उमेदवार जर भाजप बदलणारच असेल तर आपल्याला त्या पक्षात भवितव्य नाही असे समजून अनेक आमदार अधिकृतरीत्या तिकीट कापले जाण्यापूर्वीच बाहेर पडणे पसंत करत आहेत. याचे चित्र प्रसारमाध्यमांमध्ये भाजपमध्ये गळती भाजपमध्ये बंडखोरी या स्वरूपामध्ये उमटवले जात आहे.

    UTTAR PRADESH ELECTION 2022

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते