विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातून वेगळा काढून उत्तराखंडची निर्मिती करताना दोन्ही राज्यांत तणाव निर्माण झाला होता. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने एकमेकांविरुद्ध खटलेही दाखल केले होते. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही राज्यांत मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. मालमत्तेच्या विभागणीवरून एकेमेंकांविरुध्द दाखल करण्यात आलेले सर्व खटले परस्पर सहकार्याने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.Uttar Pradesh and Uttarakhand: A new era of friendship in ,all cases filed against each other will be withdrawn
सुमारे २१ वर्षांपासून दोन्ही राज्यांत वाद सुरू आहे. अनेक प्रकरणे न्यायालयात आहेत. धामी म्हणाले, गेल्या २१ वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर तोडगा निघाला आहे. सर्व खटले दोन्ही राज्ये मागे घेतील.आदित्यनाथ यांनी धामी यांच्यासोबत बैठक घेतली. दोन्ही राज्यांतील वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.
पुढील वर्षी होणाºया उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकांपूर्वी ही बैठक होत आहे. सध्या दोन्ही राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे.आपल्या लखनऊ भेटीत धामी यांनी उत्तर प्रदेश भाजप कार्यालयाला भेट दिली. त्याचबरोबरउत्तराखंड महोत्सवाच्या समारोप समारंभासह अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली.
यावेळी बोलताना धामी म्हणाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. दोन्ही राज्यांमधील सर्व प्रलंबित मुद्द्यांवर मनापासून चर्चा करण्यात आली. परस्पर सहकार्याने ते सोडवण्यासाठी एकमत झाले. काही प्रदीर्घ प्रलंबित प्रश्न जागेवरच निकाली काढण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये, दोन्ही बाजूंचे अधिकारी 15 दिवसांत समस्या सोडवण्यासाठी भेटतील.
माझा उत्तर प्रदेशशी भावनिक बंध असल्याचे सांगताना धामी म्हणाले, माझा जन्म इथे झाला. माझी सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे अगदी हायस्कूल ते इंटरमिजिएट,पदवी आणि पदव्युत्तर तसेच कायद यावर उत्तर प्रदेशचा शिक्का आहे. मला अजूनही आठवतं की मी पहिल्यांदा उत्तराखंडला निघालो तेव्हा खूप रडलो होतो. आम्ही सामान्य लोक आहोत. मात्र, आम्हाला जोडणारा वारसा एकच आहे.
9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तराखंड हे उत्तर प्रदेशामधून वेगळे झाले. तेव्हापासून सरकारे बदलूनही प्रदीर्घ प्रलंबित प्रश्न तसेच आहे. दोन्ही राज्यांच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी यावर चर्चा केली.
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनेक मुद्यांवर वाद आहे. सिंचन विभागाची 5,700 हेक्टर जमीन आणि यूपी आणि उत्तराखंडच्या सीमेवरील 1,700 घरांवरून वाद आहे.
प्रलंबित असलेले हे प्रश्न त्वरीत सोडवण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळेच आम्ही ठरवले आहे की, जमिनीच्या समझोत्याच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूचे अधिकारी १५ दिवसांत भेटतील. संयुक्त सर्वेक्षणानंतर आम्ही परस्पर निर्णय घेऊ. यूपीला जे काही हवे आहे ते त्यांच्याकडे सोपवले जाईल आणि उर्वरित उत्तराखंडकडे असेल.
भारत-नेपाळ सीमेवर चंपावत जिल्ह्यात जुना बॅरेज आहे. त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे खराब झालेल्या किच्चा येथील बॅरेजचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे. यूपी परिवहन विभाग उत्तराखंडला 205 कोटी आणि यूपीचा वन विभाग उत्तराखंडला 90 कोटी देय रक्कम देईल.
गृहनिर्माण विभागाची मालमत्ता आणि देय दोन्ही राज्ये समान रीतीने वाटून घेतील. किच्चा येथील बसस्थानक उत्तराखंडला हस्तांतरित केले जाईल. हरिद्वारमधील अलकनंदा हॉटेल देखील महिनाभरात उत्तराखंडलो हस्तांतरित केले जाईल.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील तेथे भेट देतील, धामी म्हणाले की, अप्पर गंगा कालव्यावरील साहसी खेळांसाठी एनओसीची आवश्यकता माफ करण्यात आली आहे.आदित्यनाथ उत्तराखंड निवडणुकीत प्रचार करणार का, असे विचारले असता धामी म्हणाले, हो, नक्कीच. का करणार नाही?
Uttar Pradesh and Uttarakhand: A new era of friendship in ,all cases filed against each other will be withdrawn
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी