• Download App
    कोरोना टाळण्यासाठी डबल मास्क वापरा, एका मास्कमुळे फक्त 40% सुरक्षा, वाचा काय सांगतात शास्त्रज्ञ.... । Use double mask to avoid corona, one mask only 40% effective, read what scientists say

    कोरोना टाळण्यासाठी डबल मास्क वापरा, एका मास्कमुळे फक्त ४०% सुरक्षा, वाचा काय सांगतात शास्त्रज्ञ….

    Double Mask : वैद्यकीय जर्नल ‘द लॅन्सेट’मध्ये आलेल्या नव्या अभ्यासानंतर कोरोनाच्या हवेतून प्रसारावर बहुतांश शास्त्रज्ञांचे एकमत झाले आहे. या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, कोरोना थेंबांमधून पसरत नाही, तर तो एअरबोर्न आहे म्हणजेच हवेतून पसरतोय. या अभ्यासावर बहुतांश शास्त्रज्ञांचे एकमत आहे. कोरोना थेंबांतून पसरला किंवा हवेतून पसरत असला तरी या दोन्ही बाबतींत तुम्ही कशापासून सुरक्षित राहू शकता? या प्रश्नाचे उत्तर मास्क असेच आहे. फक्त आता शास्त्रज्ञ एकाऐवजी दोन मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. एन-95 हा परिणामकारक असला तरी दररोज एकच मास्क वापरू नका, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. Use double mask to avoid corona, one mask only 40% effective, read what scientists say


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : वैद्यकीय जर्नल ‘द लॅन्सेट’मध्ये (The Lancet Report) आलेल्या नव्या अभ्यासानंतर कोरोनाच्या हवेतून (Airborne) प्रसारावर बहुतांश शास्त्रज्ञांचे एकमत झाले आहे. या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, कोरोना थेंबांमधून पसरत नाही, तर तो एअरबोर्न आहे म्हणजेच हवेतून पसरतोय. या अभ्यासावर बहुतांश शास्त्रज्ञांचे एकमत आहे. कोरोना थेंबांतून पसरला किंवा हवेतून पसरत असला तरी या दोन्ही बाबतींत तुम्ही कशापासून सुरक्षित राहू शकता? या प्रश्नाचे उत्तर मास्क असेच आहे. फक्त आता शास्त्रज्ञ एकाऐवजी दोन मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. एन-95 हा परिणामकारक असला तरी दररोज एकच मास्क वापरू नका, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

    एन-95 वापरणाऱ्यांनी अदलून-बदलून घालण्यासाठी दोन मास्क खरेदी करावेत. एका आठवड्याभरासाठी तुम्ही हा क्रम राबवू शकता. आठवड्यानंतरही मास्क फारसे खराब झालेले नसतील, तर पुढेही त्यांचा वापर करू शकता.

    एअरबोर्नचा अर्थ हवा पूर्ण दूषित आहे असा अजिबात नाही. तर विषाणू हवेत राहू शकतो, असाच त्याचा अर्थ आहे. खासकरून बंद जागांवर हे प्रमाण लक्षणीयरीत्या आढळते. यामुळे व्हेंटिलेशनही अशावेळी महत्त्वाचे ठरते.

    कोरोनाची पहिली लाट आताच्या तुलनेत तितकीशी त्रासदायक ठरली नाही. आताच्या परिस्थितीत कोरोनामुळे रुग्ण गंभीर होण्याचा धोका वाढला आहे. अशा अनेक केसेस आहेत, ज्यात परिपूर्ण काळजी उदा. सॅनिटाइजर, पीपीई किट व मास्क घालूनही आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. लान्सेटच्या संशोधनात कोरोनाचे विषाणू रुग्णालयांच्या एअर डक्टमध्येही आढळले आहेत. यामुळे नाकावाटे किंवा तोंडावाटे हा विषाणू आपल्या शरीरात जाऊ द्यायचा नसेल तर मास्क व्यवस्थित वापरण्याची नितांत गरज आहे. डॉक्टरांच्या मते, साधारण कपड्याच्या एका मास्कमुळे केवळ 40 टक्के सुरक्षा मिळते. अशा वेळी दोन मास्क वापरणे केव्हाही श्रेयस्कर आहे.

    परिपूर्ण बचावासाठी ही एक सोपी पद्धत वापरता येईल. सर्वात आधी सर्जिकल मास्क घाला. त्यानंतर कपड्याचा मास्क घाला. अशा डबल मास्किंगमुळे कोरोनापासून तुमचे 95 टक्क्यांपर्यंत संरक्षण होऊ शकते. लक्षात ठेवा, आपण वापरत असलेले मास्क हेसुद्धा योग्य काळजी घेऊन दररोज धुणे आवश्यक आहे. जेणेकरून मास्कमध्ये अडकलेले विषाणूही नष्ट होतील.

    Use double mask to avoid corona, one mask only 40% effective, read what scientists say

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!