• Download App
    USA and China face off on corona issue

    विषाणू उगमाच्या शोधावरून अमेरिका – चीन पुन्हा आमने सामने, एकमेकांवर दबावाचे राजकारण सुरु

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : कोरोना विषाणूचा उगम शोधण्यासाठीचे प्रयत्न दुपटीने वाढविण्याचे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुप्तचर विभागाला दिले आहेत. दरम्यान, विषाणूच्या उगमाचा नव्याने शोध घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न म्हणजे राजकीय खेळी असून ते आपली जबाबदारी झटकत आहेत, अशी टीका चीनने केली आहे. USA and China face off on corona issue

    कोरोनाचा उगम चीनच्या प्रयोगशाळेतूनच झाला असल्याचा दावा केला जात आहे. वुहानमधील प्रयोगशाळेतील अनेक संशोधक नोव्हेंबर २०१९ मध्ये आजारी पडले होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते, असे एका तपासात आढळून आल्यानंतर बायडेन यांनी हे आदेश दिले आहेत.



    याबाबत तपास करताना प्रयत्नांमध्ये दुपटीने वाढ करण्यास बायडेन यांनी गुप्तचर विभागाला सांगितले आहे. या तपासामध्ये चीनने संपूर्ण सहकार्य करावे आणि पारदर्शीपणे सर्व माहिती पुरवावी, यासाठी जगभरातील समविचारी देशांच्या मदतीने त्यांच्यावर दबाव आणणार असल्याचेही बायडेन यांनी सांगितले.

    दरम्यान, अमेरिकेला वास्तवाशी आणि सत्याशी काहीही देणेघेणे नसून विषाणूच्या उगमाचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेण्यातही त्यांना रस नाही, त्यांना केवळ कुरघोडीचे राजकारण करायचे आहे, असा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

    USA and China face off on corona issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले