Covid-19 vaccines : अवघे जग कोरोना महामारीमुळे संकटात आहे. अनेक देशांमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान भारत सरकारने अमेरिकेला कोरोनाची लस पेटंट मुक्त करण्याचा प्रस्ताव दिला होता. जेणकरून इतर देशांतही मोठ्या प्रमाणावर लसींचे उत्पादन होऊन कोरोना महामारीला हरवता येईल. भारताच्या या प्रस्तावाचे समर्थन करत आता अमेरिकेने कोरोनावरील लस पेटंटमुक्त करण्यास सहमती दर्शवली आहे. US will support patent waivers on Covid-19 vaccines
विशेष प्रतिनिधी
वाशिंग्टन : अवघे जग कोरोना महामारीमुळे संकटात आहे. अनेक देशांमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान भारत सरकारने अमेरिकेला कोरोनाची लस पेटंट मुक्त करण्याचा प्रस्ताव दिला होता. जेणकरून इतर देशांतही मोठ्या प्रमाणावर लसींचे उत्पादन होऊन कोरोना महामारीला हरवता येईल. भारताच्या या प्रस्तावाचे समर्थन करत आता अमेरिकेने कोरोनावरील लस पेटंटमुक्त करण्यास सहमती दर्शवली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेने कोरोनावरील लस जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवण्यासाठी पेटंट्स रद्द करण्याची मागणी केली होती. जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) पुढाकाराने अमेरिकेने लसीला बौद्धिक संपदेच्या बाहेर ठेवण्यास पाठिंबा दर्शवला आहे. या मान्यतेनंतर अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरीन म्हणाल्या की, बायडेन सरकार बौद्धिक संपत्ती संरक्षणाचे समर्थन करते, परंतु लस पेटंटमध्ये सूट केवळ कोरोना महामारी संपुष्टात आणण्यासाठीच दिली जात आहे.
तथापि, पेटंटसंदर्भात त्या असेही म्हणाल्या की, जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) सदस्यांमध्ये याबाबत करार करण्यास वेळ लागेल. निवेदनात असेही म्हटले आहे की, अमेरिका बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारांचे जोरदार समर्थन करते, परंतु साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर जागतिक व्यापार संघटनेत लसीला पेटंटमुक्त करण्यावर जोर देईल.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह (कनिष्ठ सभागृह) च्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना एक पत्र लिहिले होते. या लसीमधून पेटंट काढून टाकण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली. या पत्रावर 110 सदस्यांनी सही केली होती.
कोरोना लसीमधून पेटंट हटवण्यासाठी भारताने जागतिक आरोग्य संघटनेला प्रस्ताव पाठवला होता. त्याच वेळी भारत आणि दक्षिण आफ्रिकेनेही जागतिक व्यापार संघटनेतून लसीला पेटंटमुक्त करण्याचा प्रयत्न केला. लसीवरील पेटंट हटविण्यामागील दोन्ही देशांनी आपल्या युक्तिवादामध्ये असे म्हटले होते की, असे केल्याने लस उत्पादनास गती मिळू शकते आणि हा निर्णय महामारीला संपुष्टात आणण्यासाठी निर्णायक ठरू शकतो.
US will support patent waivers on Covid-19 vaccines
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Crisis in India : चिंताजनक! देशात 24 तासांत 4.12 लाख रुग्णांची नोंद, 3980 मृत्यू; महामारीतील सर्वोच्च आकडेवारी
- जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवादी ठार, १ शरण
- पवार आजी पुन्हा पुण्याच्या रस्त्यावर; पोट भरण्यासाठी लाठी-काठीचे खेळ
- राज्यात आठवडाभर पावसाळी वातावरण; दुपारपर्यंत उकाडा , सायंकाळी बरसणार