वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेत चिनी भाषा आणि संस्कृती यांच्या प्रचार – प्रसाराच्या नावाखाली चिनी कम्युनिस्ट अजेंडा फैलावणाऱ्या 79 चिनी संस्थानांना अमेरिकेतील प्रशासनाने टाळे लावले आहेत. US pressure on Chinese communist agenda; Avoid 79 Chinese Confucius Centers in America
525 कन्फ्यूशियस सेंटर चालवून चीन तब्बल 145 देशांमध्ये आपला कम्युनिस्ट अजेंडा फैलावण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्यावर चिनी कम्युनिस्ट सरकार वर्षाला तब्बल 10 अब्ज डॉलर खर्च करते. 2004 पासून चीन सरकारने हा उद्योग सुरू केला आहे. आत्तापर्यंत सुमारे 90 लाख विद्यार्थ्यांना या कन्फ्यूशियस सेंटरमधून विशिष्ट प्रशिक्षण देण्यात आले आहे.
– मुख्य अजेंडा स्थानिक संस्कृतीवर अतिक्रमण
कन्फ्यूशियस सेंटरच्या नावाखाली आणि चिनी संस्कृतीची आणि भाषेची ओळख जगाला करून देण्यासाठी उपक्रम राबविण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात लोकशाही देशांमध्ये असंतोष फैलावणे, तिथल्या फुटीर कारस्थानांना बौद्धिक रसद पुरवणे, कन्फ्यूशियस आणि चिनी तत्वज्ञानाच्या नावाखाली स्थानिक राजकीय सामाजिक आणि धार्मिक संस्कृतीवर चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या तत्वज्ञानाचे अतिक्रमण करणे असले उद्योग या कन्फ्यूशियस सेंटर मधून चालतात. अमेरिकेतील प्रशासनाने याकडे विशेष सेंटरवर लक्ष ठेवले होते. अमेरिकेतील विविध शहरांमध्ये सुमारे 100 कन्फ्यूशियस सेंटर 2004 पासून सुरू होती. आता त्यांची संख्या केवळ 19 उरली आहे. याचा अर्थ अमेरिकेने 79 कन्फ्युसिऊस सेंटरला टाळे लावून टाकले आहे.
– तिबेट, हाँगकाँग, तैवान विषयांना प्रतिबंध
या कन्फ्यूशियस सेंटर मधून चिनी संस्कृती, चिनी भाषा, इतिहास यांचे ज्ञान दिले जाते असा जरी दावा चिनी कम्युनिस्ट सरकार करत असले तरी या सेंटरमध्ये तिबेट, चीनमधला शिंजियान प्रांत, तीन आन मेन स्क्वेअर मधील चिनी विद्यार्थ्यांचे हत्याकांड हाँगकाँग मधील चिनी शासन व्यवस्था, तैवान या विषयावर अजिबात अभ्यास करता येत नाही. कन्फ्युशिअस सेंटरच्या अभ्यासक्रमांमध्ये या विषयांचा उल्लेख देखील नाही.
– दलाई लामा यांना धमक्या, कार्यक्रम रद्द
कन्फ्यूशियस सेंटर कारवायांमुळे तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना अमेरिकेची अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील कार्यक्रम रद्द करावा लागला होता. याचाच अर्थ फक्त चिनी कम्युनिस्टांचा विशिष्ट अजेंडा राबवण्याचे काम कन्फ्यूशियस सेंटरमधून चालते हे स्पष्ट होत असल्याचे अमेरिकन प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळेच 79 संस्थांना अमेरिकन प्रशासनाने टाळे लावून टाकले आहे.
– कन्फ्यूशियस सेंटरचा संबंधित देशातील कायदे पाळण्यास नकार
चिनी कम्युनिस्टांचा अतिक्रमण करण्याचा एक नमुना म्हणून एक महत्वाची बाब या कन्फ्यूशियस सेंटरच्या पार्श्वभूमीवर लक्षात आली आहे. चिनी कन्फ्यूशियस सेंटरना चिनी कम्युनिस्ट सरकारचा दूतावास असल्यासारखे स्टेटस चिनी सरकार मागत असते. याचा अर्थ कन्फ्यूशियस सेंटरच्या आवारात चिनी कम्युनिस्ट सरकारचा कायदा चालला पाहिजे ज्या देशांमध्ये ही सेंटर्स आहेत त्या देशांच्या कायद्याचा अधिकार कन्फ्यूशियस सेंटरच्या आवारात चालता कामा नये, असा चिनी कम्युनिस्ट सरकारचा दावा आहे. हे एक प्रकारे संबंधित देशांच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा हा प्रकार आहे. चिनी राज्यकर्ते पैशाच्या बळावर गरीब अथवा मध्यम देशांमध्ये ही दादागिरी चालवतात. अमेरिका आणि भारत यांच्या सारख्या प्रगत देशांमध्ये त्यांची दादागिरी चाललेली नाही.
– भारतातला उपद्रव
भारतात देखील शहरे नक्षलवाद्यांना बौद्धिक रसद पुरवणे वेगवेगळ्या एनजीओच्या नावाखाली असले उद्योग कन्फ्यूशियस सेंटर मधून चिनी कम्युनिस्ट सरकार करत असते. त्यातूनच शहरी नक्षलवाद यासारखे मोठे भूत भारतात उभे राहिले आहे. या प्रकारचा धोका अमेरिकेने वेळीच ओळखून तब्बल 79 चिनी संस्थांना टाळे लावून टाकले आहे. भारतात उपद्रवी चिनी कन्फ्यूशियस सेंटर्सवर कधी अशी कारवाई होणार?? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
US pressure on Chinese communist agenda; Avoid 79 Chinese Confucius Centers in America
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता
- Congress : जनतेशी संपर्क तुटल्याची कबुली देत राहुल गांधींच्या तोफा एकाच वेळी भाजप आणि प्रादेशिक पक्षांवर!!
- BJP – Congress : दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये लागलीये एकमेकांना “फॉलो” करण्याची स्पर्धा!!
- लाकडी निंबोडी योजना :सोलापूरकरांचा गैरसमज काढण्याचे काम अजितदादांनी दिले जलसंपदा विभागाला!!