• Download App
    अमेरिकेच्या भारतातील राजदूतांनी घेतली सरसंघचालकांची भेट, राष्ट्रनिर्मितीच्या आरएसएसच्या विचाराने भारावले|US Ambassador to India meets Sarsanghchalak, overwhelmed by RSS's idea of ​​nation building

    अमेरिकेच्या भारतातील राजदूतांनी घेतली सरसंघचालकांची भेट, राष्ट्रनिर्मितीच्या आरएसएसच्या विचाराने भारावले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: भारतातील अमेरिकेचे राजदूत अतुल केशप यांचा बुधवारी कार्यालयातील आपल्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. राष्ट्रनिर्मितीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचार ऐकून ते भारावून गेले.US Ambassador to India meets Sarsanghchalak, overwhelmed by RSS’s idea of ​​nation building

    भारतातील विविधता, लोकशाही आणि सर्वसमावेशकता यावर मोहन भागवत यांच्याशी खूप चांगली चर्चा झाली. ही पारंपरिक मूल्ये एका महान राष्ट्राची ऊर्जा आणि शक्ती कशी बनू शकतात हे त्यांनी स्पष्ट केलं, असं केशप म्हणाले.



    केशप यांनी मोहन भागवत यांची भेट घेतल्याचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी एक ट्वीटही शेअर केलं. आज रात्री आपण वॉशिंग्टनला रवाना होत आहोत. भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून काम करणं हा गौरव आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. भारत-अमेरिकेचे संबंध घट्ट आहेत आणि ते तसेच राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

    भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते. प्रत्येक भारतीय हिंदू आहे. समजूतदार मुस्लिम नेत्यांनी कट्टरपंथियांविरोधात एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. हिंदू शब्द हा मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीच्या समान आहे.

    यातून इतर विचारांचा अपमान होत नाही. आपण मुस्लिम वर्चस्वाबाबत नाही तर भारताच्या वर्चस्वाबाबत विचार केला पाहिजे, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते.

    US Ambassador to India meets Sarsanghchalak, overwhelmed by RSS’s idea of ​​nation building

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार