बसपाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी मोठी घोषणा केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) अध्यक्षा मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत मी स्वतः कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. UP elections BSP chief Mayawati announces not to contest assembly elections, information from Satish Chandra Mishra
वृत्तसंस्था
लखनऊ : बसपाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी मोठी घोषणा केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) अध्यक्षा मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत मी स्वतः कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मायावती यांचा 15 जानेवारीला वाढदिवस
याआधी मायावतींनी बसप कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोविड नियमांचे पालन करावे, अशा सूचना सर्व नेत्यांना दिल्या होत्या. याशिवाय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक यांनी माझा वाढदिवस त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या घरी साजरा करावा, असेही त्या म्हणाल्या. त्यांनी कोविड महामारीने त्रस्त असलेल्या गरीब लोकांना मदत केली पाहिजे, असेही कार्यकर्त्यांना सांगितले. मायावती 15 जानेवारीला त्यांचा 66 वा वाढदिवस साजरा करणार असल्याची माहिती आहे. मायावती उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या एकमेव नेत्या आहेत.
दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाल्यास, बसपने बहुतांश जागांसाठी उमेदवारांची यादी अंतिम केली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या अधिसूचनेसह 14 जानेवारीला निवडणूक आयोगाकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.
UP elections BSP chief Mayawati announces not to contest assembly elections, information from Satish Chandra Mishra
महत्त्वाच्या बातम्या
- Lata Mangeshkar : गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूमध्ये दाखल
- बीडमध्ये अधिकार्यांचा डीजेवर ठेका,कोरोनाचे नियम पायदळी तुडवले; तर नगरसेवकाच्या नातेवाईकांचा शाही विवाह सोहळा
- नेतेमंडळी सोशल डिस्टन्सिंग कधी पाळणार? : आमदार रत्नाकर गुट्टेंना कोरोनाची लागण; नुकतेच केले होते मंत्री, खासदार आणि अर्धा डझन आमदारांसोबत स्नेहभोजन