• Download App
    UP Election Song War : अखिलेश यांच्या 'यूपी में का बा'ला संबित पात्रा यांचे 'यूपी में इ बा...'ने उत्तर, पाहा व्हिडिओ । UP Election Song War Akhilesh Yadav song UP Mein Ka Ba Now Sambit Patra Answers 'UP Mein E Ba, Watch Video

    UP Election Song War : अखिलेश यांच्या ‘यूपी में का बा’ गाण्याला संबित पात्रा यांचे ‘यूपी में इ बा…’ गाण्याने उत्तर, पाहा व्हिडिओ

    UP Election Song War : उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या काळात गाण्यांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी गायिका नेहा सिंह राठौरने गायलेले ‘यूपी में का बा’ हे गाणे शेअर करून भाजपवर हल्लाबोल केला. आता अखिलेश यादव यांच्या गाण्याला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही उत्तर दिले आहे. UP Election Song War Akhilesh Yadav song UP Mein Ka Ba Now Sambit Patra Answers ‘UP Mein E Ba, Watch Video


    प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या काळात गाण्यांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी गायिका नेहा सिंह राठौरने गायलेले ‘यूपी में का बा’ हे गाणे शेअर करून भाजपवर हल्लाबोल केला. आता अखिलेश यादव यांच्या गाण्याला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही उत्तर दिले आहे.

    संबित पात्रा यांचे ट्वीट

    भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी त्यांच्या ट्विटरवर ‘यूपी में इ बा…’ गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. संबित पात्रा यांनी यातून अखिलेश यादव यांना उत्तर दिलं आहे. व्हिडिओ शेअर करताना संबित पात्रा यांनी लिहिले की, “यूपीमध्ये तुम्हाला सहा हजार रुपये मिळतील, दोनदा रेशन मिळेल, महिलांना हक्क आहे, सर्व गुंडांना कापरं भरलंय, दंगलखोरांच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवला जातोय.” वास्तविक हा व्हिडिओ यूपीमध्ये भाजपने केलेल्या कामांची मोजदाद करण्याची मोहीम म्हणून चालवली आहे. ज्याला शेअर करत संबित पात्रा यांनी अखिलेश यादव यांना प्रत्युत्तर दिले आहे.

    अखिलेश यादव यांचे ट्विट

    अखिलेश यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये भाजपवर गाण्यांच्या माध्यमातून हल्लाबोल करण्यात आला. हे गाणे गायिका नेहा सिंग राठौरने गायले आहे. त्या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत अखिलेश यादव यांनी लिहिले आहे की, ‘जनता कहे इंक़लाब बा, यूपी में बदलाव बा…, ठाठा बाबा का अबके बंटाधार बा…, डबल इंजन के फुस्स सरकार बा, आपस मा सर फुटव्वल जूतम पैजार बा…, अबके झूठ के फूलवा का बगीचा उजाड़ बा…, बाइस में बाइसिकल का चौचक भौकाल बा…’ याला प्रत्युत्तर देत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्हिडिओच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे.

    UP Election Song War Akhilesh Yadav song UP Mein Ka Ba Now Sambit Patra Answers ‘UP Mein E Ba, Watch Video

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक