• Download App
    हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेशातून जादा पाणी सोडल्याने उत्तर प्रदेशात पूर – योगी आदित्यनाथ|UP CM Yogi Aditynath targets Haryana, MP, Rajasthan for flood situation

    हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेशातून जादा पाणी सोडल्याने उत्तर प्रदेशात पूर – योगी आदित्यनाथ

    विशेष प्रतिनिधी

    गाझीपूर – हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यातून जादा पाणी सोडल्याने उत्तर प्रदेशात पूर आला आहे असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.त्यानी गाझीपूरच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.UP CM Yogi Aditynath targets Haryana, MP, Rajasthan for flood situation

    आशिया खंडातील सर्वात मोठे खेडे गहमर येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरग्रस्त १८२ कुटुंबीयांना मदत साहित्य दिले. दरम्यान, यमुना आणि बेतवा नदीला आलेल्या पुरामुळे शंभर गावे पाण्याच्या विळख्यात सापडली आहेत. पूरग्रस्त भागात पोलिस अधीक्षकांनी नौकेतून पाहणी केली आणि खाद्यसामग्री पोचवली.



    यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, की २४ तहसीलतंर्गत ६२० गावांना पुराचा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून पीडितांना मदत पोचवली जात आहे. आमदारांनी लोकांशी भेटून त्यांच्या समस्या दूर कराव्यात, असे आवाहन केले. पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे आदित्यनाथ म्हणाले.

    UP CM Yogi Aditynath targets Haryana, MP, Rajasthan for flood situation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती