• Download App
    वाह योगीजी वाह! शासकीय रुग्णालयात बेड नसेल तर खासगीत घ्या उपचार, सरकार देणारे खर्च । UP CM Yogi Adityanath Says Govt Will Pay Expenses Of Treatment of Covid 19 Patients In Private Hospital If there Is No Bed In Civil

    वाह योगीजी वाह! : शासकीय रुग्णालयात बेड नसेल तर खासगीत घ्या उपचार, सरकार देणार खर्च

    UP CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, कोरोना रुग्णांना कोणतेही खासगी किंवा सरकारी रुग्णालय उपचार नाकारू शकत नाही. जर शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध नसेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्या. नियमांनुसार, त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलेल, पण रुग्णाला त्वरित वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात. अँटिजन टेस्टमध्ये सकारात्मक आलेल्यांना योग्य उपचार दिले जावेत. रविवारी झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. UP CM Yogi Adityanath Says Govt Will Pay Expenses Of Treatment of Covid 19 Patients In Private Hospital If there Is No Bed In Civil


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, कोरोना रुग्णांना कोणतेही खासगी किंवा सरकारी रुग्णालय उपचार नाकारू शकत नाही. जर शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध नसेल तर खासगी रुग्णालयात उपचार घ्या. नियमांनुसार, त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलेल, पण रुग्णाला त्वरित वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात. अँटिजन टेस्टमध्ये सकारात्मक आलेल्यांना योग्य उपचार दिले जावेत. रविवारी झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मागच्या 24 तासांत राज्यात 35,614 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 25,633 जणांना उपचारांनंतर सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात 7.77 लाखांहून अधिक जण कोरोना संसर्गापासून मुक्त झाले आहेत. ‘दवाई भी-कडाई भी’ या सूत्राची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे ही सुखद परिस्थिती आहे.

    18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय घेणारा उत्तर प्रदेश हे पहिले राज्य आहे. १ मेपासून सुरू होणाऱ्या या लसीकरण मोहिमेसंदर्भात भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आवश्यक तयारी वेळेत पूर्ण केल्या पाहिजेत, यासाठी आढावा बैठक घेण्यात आली.

    देशातील दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना 50-50 लाख डोसची ऑर्डर पाठवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त लसीचे डोस भारत सरकार उपलब्ध करून देणार आहे. यासंदर्भात सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करावा. एकही लस वाया जाणार नाही, याची खात्री करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    UP CM Yogi Adityanath Says Govt Will Pay Expenses Of Treatment of Covid 19 Patients In Private Hospital If there Is No Bed In Civil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!