एअर इंडिया ऑफिस मध्ये हा फोन बुधवारी सायंकाळी 7 ते 7.10 च्या दरम्यान आला होता. फोन करणाऱ्याने त्याचे नाव प्रशांत बिस्वास असे सांगितले. हा कॉल बंगाली भाषेत करण्यात आला होता. Unknown call arrived at Kolkata airport, threatened to hijack the plane
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडियाच्या कार्यालयामध्ये धमकीचा फोन आल्याने एकच गोंधळ उडाला होता. एका व्यक्तीने दावा केला होता की, तो विमानाचे अपहरण करणार आहे. एअर इंडिया ऑफिसमध्ये हा फोन बुधवारी सायंकाळी 7 ते 7.10च्या दरम्यान आला होता. फोन करणाऱ्याने त्याचे नाव प्रशांत बिस्वास असे सांगितले. हा कॉल बंगाली भाषेत करण्यात आला होता.
कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीचा फोन आल्यानंतर विमानतळ प्रशासनाने तत्काळ कारवाई केली आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे बिधाननगर पोलिसांना कळवले. त्यांनी लगेच तपास सुरू केला. नंबर ट्रेस करण्यात आला आहे. हा नंबर उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बोंगाच्या कुंडीपूर भागातील आहे.
नंबर ट्रेस होताच पोलिसांनी आरोपीच्या घरी धडक मारली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी आहे. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.
काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (आयजीआय विमानतळ) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. दिल्ली पोलिसांना अल-कायदाने ई-मेलद्वारे धमकी दिली होती. ई-मेलमध्ये एका जोडप्याच्या नावाने धमक्या देण्यात आल्या होत्या, ज्यात पुढील काही दिवसात विमानतळावर बॉम्ब टाकण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि विमानतळावरही सुरक्षा वाढवण्यात आली.
Unknown call arrived at Kolkata airport, threatened to hijack the plane
महत्वाच्या बातम्या
- तिहेरी तलाक कायद्यानुसार गुन्हा, सौदी अरेबियातून पत्नीला फोनवरून दिला तलाक
- हिंदूत्वा ची तुलना तालीबान्यांशी, अभिनेत्री स्वरा भास्करवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
- तालीबान्यांच्या विजयाने भारतातही शाब्दिक फटाके, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्याने केला सलाम, हिंद मुस्लिमांना वाटतो गर्व
- तालीबानच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्या खासदारासह दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा, भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी केली तुलना
- शिवसेना आमदार यामिनी जाधव यांना अपात्र ठरविण्याची आयकर विभागाची शिफारस, निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती