Union MoS Home son Ashish Mishra : यूपी पोलिसांनी लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 14 जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. यूपी पोलिसांनी कलम 302, 120 बी आणि इतर कलमांखाली हा गुन्हा दाखल केला आहे. लखीमपूर हिंसाचारात रविवारी 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर मंत्र्यांच्या वतीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत घटनास्थळी पोहोचले आहेत. लखीमपूर खीरीला रवाना झालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Union MoS Home son Ashish Mishra booked for murder charges in Lakhimpur Incident
वृत्तसंस्था
लखनऊ : यूपी पोलिसांनी लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 14 जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. यूपी पोलिसांनी कलम 302, 120 बी आणि इतर कलमांखाली हा गुन्हा दाखल केला आहे. लखीमपूर हिंसाचारात रविवारी 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर मंत्र्यांच्या वतीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत घटनास्थळी पोहोचले आहेत. लखीमपूर खीरीला रवाना झालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, लखीमपूर खीरीच्या टिकुनिया येथे रविवारी झालेल्या हिंसाचारासाठी शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी नेत्यांनी आरोप केला होता की, मंत्र्याच्या मुलाच्या ताफ्यात समाविष्ट असलेल्या वाहनांनी आंदोलक शेतकऱ्यांना चिरडले. या हिंसाचारानंतर उद्रेक झाला आणि 4 शेतकऱ्यांव्यतिरिक्त, काफिल्यात सामील असलेले इतर चार लोकही मारले गेले.
त्याचवेळी लखनऊमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसला. अखिलेश यादव आज लखीमपूर खीरीला रवाना होणार होते, तेथे ते हिंसाचारात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटणार होते. मात्र, पोलिसांनी विक्रमादित्य मार्गावरील त्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आणि इतरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखीमपूर खीरी येथे एका कारने शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. लखीमपूर हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले. केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात हजारो शेतकरी जमले होते.
मंत्री अजय मिश्रा यांनी हिंसाचारामध्ये मुलाचा सहभाग नाकारला आहे. त्यांनी एएनआयला सांगितले, माझा मुलगा घटनास्थळी उपस्थित नव्हता. लाठ्या -तलवारीने हल्ला करणारे अनेक बदमाश होते. माझा मुलगा तिथे असता तर तो जिवंत परतला नसता. मिश्रा म्हणाले की, त्यांचा मुलगा उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी होता. मी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासोबत होतो.
Union MoS Home son Ashish Mishra booked for murder charges in Lakhimpur Incident
महत्त्वाच्या बातम्या
- Pandora Paper Leak : जाणून घ्या पेंडोरा पेपर्स लीक म्हणजे काय, भारतातील सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह 300 हून अधिक जणांवर करचोरीचा ठपका
- AARYAN KHAN DRUGS CASE : Cruise Party मध्ये आर्यन खानने केलं होत ड्रग्सचं सेवन NCB
- ‘शिक्षणोत्सव’ : ! आजपासून शाळांमध्ये किलबिलाट; ‘माझे विद्यार्थी-माझी जबाबदारी’ मुख्यमंत्री साधणार संवाद; वाचा शाळांसाठीची नियमावली
- AARYAN KHAN DRUGS CASE : ड्रग्स केसमध्ये आर्यन खान अटकेत ; शाहरुखला आधार देण्यासाठी सलमान ‘मन्नत’वर
- ..तर मग, किरीट सोमय्यांकडेच जावे लागेल, राष्ट्रवादीच्या नेत्याची सहकार मंत्र्यांना तंबी ;किसनवीर कारखान्यावरील कारवाईसाठी दिरंगाई