‘’अजित पवार काही काळ नाराज होते, कारण…’’ असंही आठवले यांनी सांगतिले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मोठा दावा केला आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबतीतही तेच होणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीची ताकद अजित पवार यांच्यामुळेच होती, आता ते भाजपासोबत आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीची अवस्था गंभीर झाली आहे. Union Minister Ramdas Athawales response to Bandkhorivar in Nationalist Congress
केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, अजित पवार काही काळ नाराज होते, कारण त्यांना राष्ट्रवादीने भाजपासोबत युती करावी असे वाटत होते, पण शरद पवार त्यासाठी तयार नव्हते. अजित पवारांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. हा मोठा बदल आहे आणि राष्ट्रवादी आणि मविआला मोठा धक्का आहे. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे उरलेल्या लोकांना सोबत घेऊन काम करतील, असे आठवलेंनी उपरोधिकपणे सांगितले.
नितीश कुमारांवर हल्लाबोल करताना आठवले म्हणाले की, ‘आम्ही विरोधी एकजुटीनवर कोणतेही ‘ऑपरेशन’ करत नाही, जनताच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे. बिहारमधील अनेक नेते आणि आमदार नितीशकुमार यांच्यावर नाराज असल्याचा दावा आठवलेंनी केला. नितीश कुमार आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आले आणि नंतर निघून गेले, त्यामुळे लोक नाराज आहेत, असे ते म्हणाले.
याशिवाय पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना रामदास आठवले म्हणाले की, ‘’मोदी हे विकासपुरुष आहेत. ते सर्वांना सोबत घेऊन जातात दलित असोत, मागासलेले असोत की अल्पसंख्याक, प्रत्येकजण पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतो. त्यामुळे संपूर्ण देशात वातावरण निर्माण झाले आहे. जसे महाराष्ट्रात झाले आहे, तसे इतर राज्यातही होऊ शकते. आमचा एनडीए 2024 पर्यंत आणखी मजबूत होऊ शकतो.’’
Union Minister Ramdas Athawales response to Bandkhorivar in Nationalist Congress
महत्वाच्या बातम्या
- ‘’… तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल’’
- ‘’युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट पण कंत्राटदारांकडून आली होती…’’ आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!
- इतरांच्या मानवी चुका, पण फडणवीसांच्या द्वेषापोटी समृद्धी महामार्गावर ठपका!!
- ‘’पवार, कंबरेचे सोडणारे तुम्ही आहात, हे तुम्ही आज दाखवूनच दिले’’ बावनकुळेंचा शरद पवारांवर घणाघात!