Union Minister Piyush Goyal : वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे आणि सोबतच आपली निर्यातही वाढत आहे. कोविड-19ची दुसरी लाट असूनही एप्रिल ते जून 2021 च्या पहिल्या तिमाहीत भारताने सर्वाधिक निर्यात केली. अभियांत्रिकी, तांदूळ, आईल मिल आणि सागरी उत्पादनांसह विविध क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे यंदाच्या तिमाहीत देशाच्या निर्यातीत वाढ होऊन 95 अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली आहे. Union Minister Piyush Goyal Says Indias Record Export in First Quarter of this year
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे आणि सोबतच आपली निर्यातही वाढत आहे. कोविड-19ची दुसरी लाट असूनही एप्रिल ते जून 2021 च्या पहिल्या तिमाहीत भारताने सर्वाधिक निर्यात केली. अभियांत्रिकी, तांदूळ, आईल मिल आणि सागरी उत्पादनांसह विविध क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे यंदाच्या तिमाहीत देशाच्या निर्यातीत वाढ होऊन 95 अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली आहे.
एप्रिल ते जून 2018-19 या कालावधीत माल निर्यात 82 अब्ज डॉलर्स आणि 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीत 90 अब्ज डॉलर्स होती. 2020-21 च्या जूनच्या तिमाहीत निर्यात 51 अब्ज डॉलर्स होती. त्याच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत निर्यात 90 अब्ज डॉलर्स इतकी होती. गेल्या महिन्यात देशाची निर्यात 47 टक्क्यांनी वाढून 32 अब्ज डॉलरवर गेली. गोयल म्हणाले की, “यावर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत देशातील वस्तूंची निर्यात कोणत्याही तिमाहीत सर्वाधिक आहे.” ते म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात 400 अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मंत्रालय सर्व भागधारकांशी मिळून काम करेल.
वाणिज्य मंत्रालयाचे ओएसडी बीव्हीआर सुब्रह्मण्यम म्हणाले, ‘आम्ही 400 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर थांबणार नाही. 2022-23 साठीचे निर्यात लक्ष्य 500 अब्ज डॉलर्स आहे. त्यानंतर पाच वर्षांत, आम्ही व्यापार निर्यातीत 1 ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य गाठू. महामारी असूनही 2020-21 मध्ये 81.72 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली होती, जी आतापर्यंतची सर्वोच्च आहे. एप्रिल 2021 मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह 6.24 अब्ज डॉलर्स होता, तो एप्रिल 2020 च्या तुलनेत 38 टक्क्यांनी वाढला.
ते पुढे म्हणाले की 623 जिल्ह्यांमधील उद्योग व अंतर्गत व्यापार (डीपीआयआयटी) प्रमोशन विभागाने मान्यता दिलेल्या स्टार्टअपची संख्या 50 हजार झाली आहे. डीपीआयआयटीचे सचिव गिरीधर अरमाने म्हणाले, “तरुण गुंतवणूकदारांनी 1.8 लाख औपचारिक रोजगार आणि 16,000 मान्यताप्राप्त स्टार्टअप्स तयार केले आहेत. त्यांना अनेक फायदे दिले जात आहेत. आम्ही स्टार्टअप क्षेत्राला पेटंट देण्याची वेगवान यंत्रणा आणली आहे.
Union Minister Piyush Goyal Says Indias Record Export in First Quarter of this year
महत्त्वाच्या बातम्या
- गर्भश्रीमंत जेफ बेजोससोबत अंतराळाच्या सफरीवर जाणार 82 वर्षे वयाच्या वॅली फंक, सर्वात पहिल्या महिला उड्डाण प्रशिक्षक
- जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक, 5 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद
- डिजिटल पेमेंट्समध्ये वाढ, यूपीआयने नोंदवला नवा विक्रम, जूनमध्ये सर्वाधिक 5.47 लाख कोटींचे व्यवहार
- गडकरींनी सांगितली इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्राची योजना, ईव्ही फायनान्स इंडस्ट्रीचीही उभारणी
- ममतांना हायकोर्टाचा दणका : हिंसाचारातील पीडितांना उपचार, रेशन देण्याचे आदेश, सर्व गुन्ह्यांच्या नोंदी आवश्यक!