• Download App
    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज कर्नाटकात रोड शो, भाजप नेतेही होणार सहभागी|Union Home Minister Amit Shah's road show in Karnataka today, BJP leaders will also participate

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज कर्नाटकात रोड शो, भाजप नेतेही होणार सहभागी

    प्रतिनिधी

    बंगळुरू : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी 2 दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत. शहा 21 आणि 22 एप्रिल रोजी दावणगेरे आणि देवनहल्ली येथे रोड शो करणार आहेत. देवनहल्ली हे 18व्या शतकातील म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांचे जन्मस्थान आहे. यादरम्यान ते 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगळुरू येथे भारतीय जनता पक्षाच्या संघटना पातळीवरील बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.Union Home Minister Amit Shah’s road show in Karnataka today, BJP leaders will also participate

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा हे राज्यातील अनेक नेत्यांची ज्यांच्याकडे निवडणूक प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्याशी बैठक घेणार आहेत. यादरम्यान ते निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करतील.



    अतिकचे निकटवर्तीय प्रतापगढ़ींना स्टार प्रचारक बनवून काँग्रेस गोत्यात

    गँगस्टर अतिक अहमद जिवंत नसला तरी त्याच्या नावावरून वाद सुरूच आहे. कर्नाटक निवडणुकीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक इम्रान प्रतापगढ़ी यांच्यावर टीका करत केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या की, अतिक अहमदसारख्या गुंडाला निवडणुकीत आपला गुरू मानणारे इम्रान प्रतापगढ़ी काँग्रेसचा प्रचार करत आहेत.

    उडुपी-चिकमगलूरच्या खासदार शोभा म्हणाल्या, इम्रान हे गँगस्टर अतिक आणि अश्रफ यांना गुरू मानतात. मित्र आणि भाऊ बोलतात. काँग्रेसने इम्रान यांना महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार केले आहे. त्याचवेळी कर्नाटकात हिंदुविरोधी भाषण देताना इम्रान हे मुस्लिम डोके टेकवणारे नसून डोके कापणारे असल्याचे सांगत आहेत. यावरून काँग्रेसचा हात गुन्हेगार आणि देशद्रोह्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट होते.

    पंतप्रधान मोदींच्या 20 सभा आणि रोड शो

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान सुमारे 20 ठिकाणी सभा आणि रोड शो करणार आहेत. पंतप्रधानांच्या प्रचार कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमांमध्ये रॅली, जाहीर सभा आणि रोड शो यांचा समावेश आहे.

    मोदींव्यतिरिक्त, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्र्यांची मजबूत टीम निवडणुकीसाठी पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

    Union Home Minister Amit Shah’s road show in Karnataka today, BJP leaders will also participate

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!