वृत्तसंस्था
पणजी : भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी (ता. १४ ) गोव्यात येणार आहेत. ताळगाव येथे भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर भाजपचे गोव्याचे निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीसही येणार आहेत. ते भाजपचे आमदार व मंत्र्यांबरोबर स्वतंत्र चर्चा करणार आहेत. Union Home Minister Amit Shah will also lay the foundation stone of the National Forensic University, Sanjeevani factory ethanol project in Goa on Saturday
अमित शहा शनिवारी गोव्यात येतील. नंतर ते धारबांदोडा येथील राष्ट्रीय फॉरेंसिक विद्यापीठाची तसेच संजीवनी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची पायाभरणी करतील. नंतर पणजी सर्किट हॉऊसवर मंत्री आणि भाजप आमदारांबरोबर बैठका घेतील. त्यानंतर ताळगाव येथील कम्युनिटी सभागृहात भाजप कार्यकर्त्यांच्या सभेत ते मार्गदर्शन करणार आहेत.
गोवा पुन्हा जिंकण्यासाठी आमदारांशी चर्चा
भाजपचे गोवा निरीक्षक आणि भाजपचे गोवा निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस शुक्रवारी गोव्यात येत आहेत. अमित शाह यांच्या आमदारांबरोबरच्या बैठकीत दोघे भाग घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर २२ चा आकडा कसा पार करेल या संदर्भात फडणवीस हे भाजपच्या केंद्रीय समितीशी चर्चा करतील.
Union Home Minister Amit Shah will also lay the foundation stone of the National Forensic University, Sanjeevani factory ethanol project in Goa on Saturday
महत्त्वाच्या बातम्या
- जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमामुळे स्पेनच्या टुरिझम व्यवसायात झाली होती 32% नी वाढ ?
- दुर्गा सन्मान: द फोकस इंडियाच्या वतीने पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न ; प्रशांत दामलेंनी द फोकस इंडियाला शुभेच्छा देत केले कौतुक
- चोर समजून २६ वर्षीय तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक
- आईस्क्रीम खाणे आता महागणार!, १८ टक्के जीएसटी लागू