वृत्तसंस्था
नवी दिल्ली – कोरोना फैलावाचा अटकाव करण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ५ कलमी कार्यक्रम सूचविला आहे. या पत्राला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी उत्तर दिले आहे. Union Health Minister Dr Harsh Vardhan writes to ex- PM Manmohan Singh on the latter’s letter to PM Modi
कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्याच्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या सूचनेचे डॉ. हर्षवर्धन यांनी स्वागत केले असून त्याचवेळी या सूचनेचे पालन देशातील सर्व राज्यांनी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या पत्रात व्यक्त केलेल्या मतांशी सहमती दर्शविली आहे. त्याचवेळी काँग्रेस शासित राज्यांमधील त्रूटी आणि काँग्रेसच्या काही नेत्यांच्या विधानांमधील विसंगती यांच्यावरही बोट ठेवले आहे.
या पत्रोत्तरात डॉ. हर्षवर्धन म्हणातात, डॉ. मनमोहन सिंगजी, आपण लसीकरणासंबंधी व्यक्त केलेल्या मताशी सरकार सहमत आहे. पण काँग्रेसमधील काही नेते लसीबद्दल गैरसमज पसरवत होते. काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री लसीकरणाविषयी शंका व्यक्त करीत होते. त्यांनी हा विषय आपण जेवढा घेतला, तेवढ्या गांभीर्याने घेतला नव्हता, आणि अजूनही घेतलेला दिसत नाही.
काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या वक्तव्यामुळे अनेक राज्यांमधील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण देशातील लसीकरणाच्या टक्केवारीच्या तुलनेत कमी राहिले आहे. आणि नेमक्या याच राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक बनून आली आहे. या आणि अशा अनेक विसंगती दाखविता येतील. पण आपण आमच्यासाठी आदरणीय आहात. आपला आदर आणि सन्मान राखून आपण केलेल्या सूचनांचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करेल, अशी ग्वाही डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रोत्तराच्या अखेरीस दिली आहे. हे ३ पानी पत्र मूळातून वाचण्यासारखे आहे.