• Download App
    "सहा मुस्लीम देशांवर फेकले होते बॉम्ब" म्हणत निर्मला सीतारामन यांनी बराक ओबामांवर निशाणा साधला! Union Finance Minister Nirmala Sitharaman targets Barack Obama

    “सहा मुस्लीम देशांवर फेकले होते बॉम्ब” म्हणत निर्मला सीतारामन यांनी बराक ओबामांवर निशाणा साधला!

    ‘’… त्याच्या आरोपांवर कोणी विश्वास कसा ठेवणार?’’ असंही सीतारामन म्हणाल्या  आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी पंतप्रधान मोदींचे समर्थन करत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर निशाणा साधला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान मोदींना भारतातील मुस्लिमांच्या स्थितीबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तर दिले की आम्हाला अमेरिकेशी चांगले संबंध हवे आहेत. पण तरीही भारतात धार्मिक स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक माजी अध्यक्ष ज्यांच्या राजवटीत सहा मुस्लिमबहुल देशांवर 26,000 हून अधिक बॉम्ब टाकण्यात आले ते प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याच्या आरोपांवर कोणी विश्वास कसा ठेवणार? Union Finance Minister Nirmala Sitharaman targets Barack Obama

    प्रसारमाध्यमांशी बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या, पंतप्रधानांनी स्वत: अमेरिकेतील पत्रकार परिषदेत सांगितले आहे की, त्यांचे सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर काम करते आणि कोणत्याही समुदायाशी भेदभाव करत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की, काही लोक विनाकारण अशा वादविवादात गुंततात आणि एक प्रकारे अनावश्यक मुद्दे अधोरेखित करतात. सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींचा 13 देशांनी गौरव केला आहे, त्यापैकी 6 देश मुस्लीम बहुल आहेत.

    विरोधकांवर निशाणा साधत त्या म्हणाले की, मला वाटते की ते(विरोधक) भाजपा किंवा पंतप्रधान मोदींशी निवडणूकीत स्पर्धा करू शकत नाहीत. त्यामुळे ते अशा मोहिमा राबवत आहेत. अशा प्रचारात काँग्रेसचा मोठा वाटा आहे. विरोधी एकजुटीच्या सध्या सुरू असलेल्या कवायतीबाबत सीतारामन म्हणाल्या की, ते कोणत्या उद्देशाने एकत्र येत आहेत हे मला माहीत नाही. भाजपाला पराभूत करणे हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. ते लोकांसाठी काय करणार हे सांगत आहेत का? त्यांच्या राजवटीत देशात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला, पण गेल्या ९ वर्षांत देशात केवळ विकासच होत आहे.

    Union Finance Minister Nirmala Sitharaman targets Barack Obama

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र