विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अडीच महिन्यानंतरही करदात्यांना प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर संताप व्यक्त करत इन्फोसिसचचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सलील पारेख यांच्याकडे स्पष्टीकरण मागत समन्स बजावले. त्यानंतर ई- फाईलिंग पोर्टल तातडीने सुरू झाले.Union Finance Minister Nirmala Sitharaman angry over Infosys CEOs, e-filing portal launched after summons
सलील पारेख यांना २३ आॅगस्टला अर्थमंत्री निर्मली सीतारमन यांच्यासमोर हजर होण्यास सांगितलं आहे.यावेळी लाँच होऊन अडीच महिने झाल्यानंतरही ई-फायलिंग पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी अद्याप दूर का झाल्या नाहीत याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सुलभ, सोपी व गतिमान करण्याच्या उद्देशाने ७ जूनला सायंकाळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्राप्तिकर ई-फायलिंग संकेतस्थळाची पहिली अनुभूती करदात्यांसाठी त्रासदायकच ठरली होती. पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या तक्रारींची रीघ पाहता, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे संकेतस्थळ विकसित करणाऱ्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि तिचे विद्यमान अध्यक्ष नंदन नीलेकणी यांना जाहीरपणे जाब विचारत, अडचणी तात्काळ दूर करण्याचे निर्देश दिले होते.
वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी प्रणालीसाठी जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन) संकेतस्थळ तयार करणाऱ्या इन्फोसिसवर, २०१९ साली प्राप्तिकराच्या ई-भरणा करणारी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
करदात्यांकडून दाखल होणाऱ्या विवरण पत्रावर प्रक्रियेचा कालावधी सध्याच्या ६३ दिवसांवरून एक दिवसांवर आणून, त्यायोगे कर-परतावा (रिफंड) वितरित करण्याची प्रक्रियाही गतिमान करण्याचे उद्दिष्ट यामागे होते. त्यानुसार तयार केले गेलेले नवीन संकेतस्थळ ७ जूनच्या रात्रीपासून कार्यान्वितही झाले. मात्र नवीन ई-फायलिंग संकेतस्थळावर लॉग इन करण्यात आणि त्याच्या वापरासंबंधाने अनेक प्रकारच्या अडचणींचा करदात्यांना सामना करावा लागत असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच अर्थमंत्री सीतारामन यांच्या ट्विटर टाइमलाइनवर तक्रारींची रीघ लागली होती.
अर्थमंत्र्यांनी ट्वीटद्वारेच या बाबतीत आपला संताप व्यक्त केला होता. ह्यइन्फोसिस आणि नंदन निलेकणी हे दजेर्दार व गुणात्मक सेवेची अपेक्षा राखणाºया करदात्यांचा हिरमोड करणार नाहीत अशी आशा आहे, असे त्यांनी ट्वीट केले होते.
निर्मला सीतारमण यांच्या ट्विटला उत्तर देताना इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि विद्यमान अध्यक्ष नंदन नीलेकणी यांनी म्हटलं होतं की, निर्मला सीतारमणजी नवीन ई-फायलिंग पोर्टल फायलिंग प्रक्रिया सुलभ करेल तसंच वापरकर्त्यांना चांगला देईल. पहिल्या दिवशी काही तांत्रिक त्रुटी आमच्या लक्षात आल्या असून त्यांचे निराकरण करण्याचे काम करत आहोत. आलेल्या अडचणींबद्दल इन्फोसिस खेद व्यक्त करत असून पुढील आठवड्यात यंत्रणा स्थिर होईल अशी आशा आहे.
दरम्यान, हे वेब पोर्टल सुरू झाल्यानंतर खुद्द निर्मला सीतारमण यांनीच ट्वीट करून यासंदर्भातली माहिती करदात्यांना दिली होती. मात्र, हे पोर्टल देशवासीयांच्या सेवेसाठी आहे, असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर काही तासांतच त्यांना इन्फोसिसला तांत्रिक बिघाडावरून सुनवावे लागले होते.
Union Finance Minister Nirmala Sitharaman angry over Infosys CEOs, e-filing portal launched after summons
महत्त्वाच्या बातम्या
- सत्ताधाऱ्यांना सतत प्रश्न विचारा, मुलभूत अधिकारांवरील आक्रमकण खपवून घेऊ नका, न्यायमूर्ती रवींद्र भट यांचे आवाहन
- अफगणिस्थानमधून भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक
- भूसंपादनातील विलंब, वन आणि पर्यावरण मंत्रालयांच्या मंजुरीअभावी रखडलेत ४८३ प्रकल्प, ४.४३ ला रुपये खर्च जादा होणार
- ३७०च्या दणक्यानंतर केंद्राचा नवा दंडुका… हुर्ऱियतच्या दोन्ही गटांवर बंदी घालून कंबरडे मोडणार