• Download App
    पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित घरगुती गॅस किंमत मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी Union Cabinet approves revised domestic gas pricing guidelines

    केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित घरगुती गॅस किंमत मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी – अनुराग ठाकूर

    सर्वसामान्य घरगुती ग्राहकांपासून ते शेतकरी आणि वाहनचालकांपर्यंत सर्वांनाच याचा फायदा होणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (६ एप्रिल) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यामध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात दिलासा देण्यात आला आहे. पीएनजीवर सुमारे १० टक्के कपात होईल आणि सीएनजीवरही ५ ते ६ रुपयांची प्रतिकिलोमागे कपात होईल. याचबरोबर मंत्रिमंडळाने सुधारित घरगुती गॅस किंमतीच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी दिली आहे. Union Cabinet approves revised domestic gas pricing guidelines

    बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने गॅसच्या किमतीच्या नवीन फॉर्म्युलाला मंजुरी दिली आहे. सीएनजी आणि पाईप स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींवर कमाल मर्यादा निश्चित केली आहे.

    घरगुती गॅसची किंमत आता आंतरराष्ट्रीय हब गॅसऐवजी आयात केलेल्या क्रूडशी जोडली गेली आहे आणि आता घरगुती गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या टक्के असेल. दर महिन्याला यावर निर्णय घेतला जाईल. सर्वसामान्य घरगुती ग्राहकांपासून ते शेतकरी आणि वाहनचालकांपर्यंत सर्वांनाच याचा फायदा होणार आहे.

    Union Cabinet approves revised domestic gas pricing guidelines

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये