वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : युनिलिव्हर युनायटेड स्टेट्सच्या डोव्ह शॅम्पूमध्ये बेंझिन हे घातक रसायन सापडले आहे. शॅम्पूमधील या घटकामुळे कॅन्सर होण्याचा धोका हा सर्वाधिक वाढतो. त्यामुळे युनिलिव्हर कंपनीने अमेरिकी बाजारातून डव्ह हे एरोसोल ड्राय शॅम्पू परत मागवले आहेत. Unilever withdraws DOVE dry shampoo from the US market due to cancer risk
यापूर्वी काही दिवस आधी जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकी कंपनीलाही अशा प्रकराचा फटका बसला होता. कंपनीच्या बेबी पावडरमध्ये घातक पदार्थ आढळल्याने त्या कंपनीला बेबी पावडर मागे घ्यावी लागली होती.
युनिलिव्हर युनायटेड स्टेट्स कंपनीची विविध उत्पादने जगभर मोठ्या प्रमाणात वापरली जातात. कंपनीचे उत्पादन Dove शांपूत बेंझिन हे मानवी शरीरासाठी घातक ठरणारा घटक आहे. बेंझिन हा घटक मानवी शरीरात नाक, तोंड आणि त्वचेच्या माध्यमातून प्रवेश करतात. त्यामुळे Dove शॅम्पूचे उत्पादन युनिलिव्हरने मागे घेतले आहे. Dove शाम्पूबरोबरच कंपनीने अनेक उत्पादने देखील अमेरिकेतील बाजारातून मागे घेतली आहेत.
Unilever withdraws DOVE dry shampoo from the US market due to cancer risk
महत्वाच्या बातम्या