• Download App
    तृणमूलच्या आमदाराचे दुर्दैव, मृत्यू झाल्यावर सात दिवसांनी त्यांचा विजय जाहीर झाला|Unfortunately for the Trinamool MLA, his victory was declared seven days after his death

    तृणमूलच्या आमदाराचे दुर्दैव, मृत्यू झाल्यावर सात दिवसांनी त्यांचा विजय जाहीर झाला

    मृत्यू झाल्यावर सात दिवसांन विजय जाहीर होण्याचा दुर्दैवी प्रकार तृणमूल कॉंग्रेसचे खारदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या बाबत घडला आहे. उत्तर २४ परगना जिल्ह्याच्या खारदा विधानसभा मतदारसंघातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा विजयी झाल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, हे निकाल जाहीर होण्यापूर्वी काही दिवस अगोदरच म्हणजे २५ एप्रिल रोजी काजल सिन्हा यांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.Unfortunately for the Trinamool MLA, his victory was declared seven days after his death


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : मृत्यू झाल्यावर सात दिवसांन विजय जाहीर होण्याचा दुर्दैवी प्रकार तृणमूल कॉंग्रेसचे खारदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या बाबत घडला आहे.

    उत्तर २४ परगना जिल्ह्याच्या खारदा विधानसभा मतदारसंघातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा विजयी झाल्याचं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, हे निकाल जाहीर होण्यापूर्वी काही दिवस अगोदरच म्हणजे २५ एप्रिल रोजी काजल सिन्हा यांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.



    ‘दिवंगत’ काजल सिन्हा यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांला २८,०४१ मतांच्या फरकानं मात दिल्याचं रविवारी समोर आलं होतं. परंतु, दु:खद म्हणजे या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी काजल सिन्हा मात्र या जगात नाहीत

    .करोना संक्रमणामुळे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा यांना आपले प्राण गमवावे लागले होते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काजल सिन्हा हे २१ एप्रिल रोजी करोना संक्रमित आढळले होते.

    त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.काजल सिन्हा यांच्या मृत्यूमुळे खारदा मतदारसंघातील रिक्त जागेवर आता पुन्हा एकदा निवडणुका होणार आहेत.

    Unfortunately for the Trinamool MLA, his victory was declared seven days after his death

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य