• Download App
    UPSC Civil परीक्षेतील घवघवीत यश! १३१ उमेदवार उत्तीर्ण! राचकोंडा पोलिस आयुक्त IPS महेश भागवत यांच्या मोफत मार्गदर्शनामुळे झाले शक्य | Under the free mentorship of CP Mahesh Bhagwat IPS, 131 candidates successfully cracked UPSC Civil Services exam

    UPSC Civil परीक्षेतील घवघवीत यश! १३१ उमेदवार उत्तीर्ण! राचकोंडा पोलिस आयुक्त IPS महेश भागवत यांच्या मोफत मार्गदर्शनामुळे झाले शक्य

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद : राचकोंडा पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी मागील सात वर्षांमध्ये १००० पेक्षा जास्त युपएससीच्या उमेदवारांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी महेश भागवत आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली १३१ उमेदवारांनी युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेमध्ये यश मिळवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून एकूण ७६१ उमेदवारांची  शिफारस केली गेली होती. यामध्ये (IAS Indian Administrative Service) IFS  (Indian Foreign Service) तसेच सेंट्रल सर्विसेस ग्रुप ‘ए’ आणि ‘बी’ यांचा समावेश आहे.

    Under the free mentorship of CP Mahesh Bhagwat IPS, 131 candidates successfully cracked UPSC Civil Services exam

    या 761 उमेदवारांपैकी 131 उमेदवारांना भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. ३, ८, १४, १८, १९ आणि २० तसेच १०० च्या आतील रँकमध्ये आलेल्या १९ उमेदवारांना त्यांनी मार्गदर्शन केले.

    अंकिता जैन (Rank ३), वैशाली जैन (२१), रलापल्ली जगत साई (३२) आणि रलापल्ली वसंत कुमार (१७०) आणि तेलंगणाचा टॉपर पी. श्रीजा (२०) यांचा विशेष उल्लेख भागवत यांनी केला. आपली ड्युटी सांभाळून या सात वर्षांमध्ये त्यांनी एक हजार उमेदवारांना व्हाट्सअप ग्रुप


    UPSC Results : 761 विद्यार्थी उत्तीर्ण, शुभम कुमार प्रथम, दुसऱ्या क्रमांकावर जागृती अवस्थी, असा चेक करा निकाल


    च्या मदतीने मार्गदर्शन केलेले आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या बरोबरच महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान, उत्तराखंड, बिहार, ओरिसा, आसाम,  जम्मू-काश्मीर, आणि पश्चिम बंगाल मधील उमेदवारही या ग्रुपमध्ये सामील आहेत.

    भागवत यांनी नाव, राज्य आणि उमेदवारांनी घेतलेल्या विषयांच्या आधारावर त्यांना परीक्षेसाठी तयार केले. तसेच ग्रुपवर बातम्या आणि करंट अफेयर्स शेअर करून भागवत यांनी सर्वांना साहाय्य केले. भागवत यांच्या टीममध्ये डॉक्टर शैलेंद्र देवळणकर, नितेश पाथोडे IRS, नीलकंठ आव्हाड IAS, आनंद पाटील IAS, मुकुल कुलकर्णी, IRS, डॉ. विवेक कुलकर्णी, डिरेक्टर ऑफ जेपीसी, डॉ. श्रीकर परदेशी IAS, राजू रानडे IRS रिटायर्ड, सुप्रिया देवस्थळी ICAS, अभिषेक सराफ, अनुदीप दुरिषेट्टी, नरसिम्हा रेड्डी या सर्वांचा समावेश आहे.

    यूपीएससी पर्सनॅलिटी टेस्ट या व्हाट्सअप ग्रुपमधून त्यांनी सर्वांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. भागवत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे.

    Under the free mentorship of CP Mahesh Bhagwat IPS, 131 candidates successfully cracked UPSC Civil Services exam

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य