Sunday, 4 May 2025
  • Download App
    काका- पुतण्याची युती, मात्र स्वत:च्या पक्षांची ओळख कायम ठेऊन सोबत लढणार|Uncle-nephew alliance, but will fight together while maintaining the identity of their own parties

    काका- पुतण्याची युती, मात्र स्वत;च्या पक्षांची ओळख कायम ठेऊन सोबत लढणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांची युती झाली आहे. मात्र, दोघेही आपापल्या पक्षांची ओळख कायम ठेऊन सोबत लढणार आहेत. त्यामुळे मनभेद अद्यापही पूर्ण दूर झाले नाहीत,असे म्हटले जात आहे.Uncle-nephew alliance, but will fight together while maintaining the identity of their own parties

    उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरुवारी लखनऊमध्ये त्यांचे काका शिवपाल यादव यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अखिलेश यादव यांनी जाहीर केलं की समाजवादी पक्ष आणि शिवपाल यादव यांची प्रगतिशील समाजवादी पार्टी लोहिया पक्ष मिळून निवडणूक लढतील.



    समाजवादी पक्ष शिवपाल यादवांच्या पक्षाला किती जागा देणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, शिवपाल यादव समर्थकांना 15 जागा दिल्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.उत्तर प्रदेशची सत्ता पुन्हा काबिज करण्यासाठी अखिलेश यादव प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत.

    त्यामुळेच अखिलेश यादव यांनी आपले काका शिवपाल यादव यांच्याशी जुळवून घेतले. अखिलेश यांनी अनेक सार्वजनिक व्यासपीठावरुन सांगितलं की काकांचा योग्य सन्मान केला जाईल. राजकीय लढाईत ते आमच्यासोबत आहेत. इतकंच नाही तर शिवपाल यादव यांच्या जवळच्या नेत्यांना अ‍ॅडजस्ट करण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

    अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यातील विवाद 2016 मध्ये समोर आला होता. बराच काळ हा तणाव चालू होता. या घरगुती लढाईत अखिलेश यादव यांचा विजय झाला होता. त्यानंतर मात्र अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांनी परिवारात कुठलीही लढाई नसल्याचं सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे काका-पुतणे पुन्हा एकत्र येत आहेत.

    Uncle-nephew alliance, but will fight together while maintaining the identity of their own parties

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू

    Igla S missile : भारतीय लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळाले

    Manoj Tiwari : मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला!