वृत्तसंस्था
मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता आज २६ व्या दिवशी मावळली आहे. कारण युक्रेनने गुढगे टेकण्यास साफ नकार दिला आहे. दुसरीकडे रशियाने राजधानी किव्हवर हवाई हल्ले वाढवीले आहेत. Ukraine rejects offer of surrender; Russia launches air strikes on Kiev
युक्रेनच्या मारियुपोल शहराच्या अंतिम कब्जासाठी रशियाने दिलेली आत्मसमर्पण मुदत संपली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाने रविवारी रात्री मारियुपोल प्रशासनाला मॉस्को वेळेनुसार पहाटे ५ वाजता (भारतीय वेळेनुसार ८ वाजता) आत्मसमर्पण करण्याची अंतिम मुदत दिली होती. मात्र, युक्रेनने हा प्रस्ताव आधीच धुडकावून लावला आहे.सीएनएनच्या वृत्तानुसार, युक्रेनच्या उपपंतप्रधान इरिना वेरेश्चुक यांनी सांगितले की, आत्मसमर्पण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रशियाने आक्रमण रोखावे.
दुसरीकडे, रशियन सैन्याने रविवारी रात्री राजधानी कीव्हमधील निवासी भागावर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात एक जण ठार झाला असून अनेक घरे आणि एक शॉपिंग मॉल उद्ध्वस्त झाला आहे. युक्रेनच्या आपत्कालीन सेवेने मॉलच्या ढिगाऱ्यातून एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढले आहे. तसेच एका शाळेवर हल्ला केला.
Ukraine rejects offer of surrender; Russia launches air strikes on Kiev
महत्त्वाच्या बातम्या
- वडीलांच्या उर्जेवर निवडून आलेल्या युवक कॉँग्रेसच्या अध्यक्ष म्हणे ताकद दाखविणार
- आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, लाभ पवार सरकार घेते, शिवसेना नेत्याचा राष्ट्रवादी कॉँग्रेसवर हल्लाबोल
- मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना आता विरोधकांना खुपायला लागल्या, वित्तीय स्थितीचे कारण देत केला विरोध
- आरोग्य विभागाचे डोके फिरले, कुटुंब नियोजनासाठी समुपदेशन करणाऱ्या आशा सेविकांच्या किटमध्ये रबरी लिंग