• Download App
    Ukraine Indian students hostage : युक्रेनच्या सैन्याकडून भारतीय विद्यार्थ्यांचा ढाल म्हणून वापर!! । Ukraine Indian students hostage: Use of Indian students as shield by Ukrainian army !!

    Ukraine Indian students hostage : युक्रेनच्या सैन्याकडून भारतीय विद्यार्थ्यांचा ढाल म्हणून वापर!!

    वृत्तसंस्था

    कीव्ह : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूपपणे मायदेशात आणण्याचे आव्हान मोदी सरकारसमोर आहे. त्यासाठी सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ सुरु केले आहे. मात्र त्यासाठी आता युक्रेनचा धोंडा म्हणून उभा आहे, असे चित्र आहे. Ukraine Indian students hostage: Use of Indian students as shield by Ukrainian army !!

    पुतिन – मोदी चर्चा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले. आमचे लष्कर कीव आणि खारकीवमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास पूर्णपणे मदत करत आहे. परंतु युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले आहे, तसेच भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन मानवी ढाल बनवत आहे आणि भारतीय विद्यार्थ्यांना रोखले जात आहे, असा खळबळजनक दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.



    युक्रेनचा दावा निराळा

    याच दरम्यान युक्रेनकडून वेगळेच वक्तव्य समोर आले आहे. आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी एक कॉरिडोअर तयार करण्यासाठी रशियासोबतच चर्चा करु, असे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करत भारत आणि अन्य देशांना आवाहन केले आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे खारकीव, सुमीसह अन्य शहरात आपल्याला अडकलेल्य़ा विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मानवी कॉरिडोअर बनवण्यास रशियाची चर्चा करा असे युक्रेनने भारत, पाकिस्तान आणि चीनला सांगितले. जे भारतीय विद्यार्थी अडकले आहेत त्यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केली जावी, अशी मागणी भारताने रशियाकडे केली होती.

    तर दुसरीकडे रशियानेच युक्रेनवर गंभीर आरोप केले. जे रणगाडे रोखले जात आहेत, त्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले, तर दुसरीकडे पोलंडमध्ये बॉर्डर गार्ड्सने १०० भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यांना पुन्हा युक्रेनच्या दिशेने पाठवए असल्याचा दावा बेलारुसच्या राजदूतांनी युएनमध्ये केला.

    Ukraine Indian students hostage : Use of Indian students as shield by Ukrainian army !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!