विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या (NET) तारखा जाहीर केल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) राष्ट्रीय पात्रता चाचणीच्या (NET) तारखा जाहीर केल्या आहेत. कोरोनामुळे (Covid 19 in India) परीक्षा विलंबानं होत आहे. विशेष म्हणजे डिसेंबर 2020 सत्रातील परीक्षा आणि जून 2021 सत्रातील परीक्षा एकत्र घेण्याचा निर्णय UGC नं घेतला आहे. नेट परीक्षा 6 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या दोन सत्रात परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोनामुळे परीक्षेचे अर्ज मागवण्यात उशीर होत असल्याचं देखील UGC नं म्हटलं आहे. UGC NET 2021 Exam: NET 2021 exam dates announced; This is the last date- Learn how to apply
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षेचे आयोजन कॉम्प्युटरवर सीबीटी मोडमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेत दोन पेपर असून त्यात बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. दोन्ही पेपरमध्ये 150 प्रश्न विचारण्यात येतील. परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ugcnet.nta.nic किंवा nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवारांना 5 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तर 6 सप्टेंबर 2021 पर्यंत परीक्षा शुक्ल (Exam Fee)भरता येणार आहे.
अशी आहे अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्ज करण्याची तारीख: 10 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख : 6 सप्टेंबर 2021
अर्ज दुरुस्त करण्याची तारीख : 7 ते 12 सप्टेंबर
परीक्षेची तारीख : 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2021
दरम्यान, याआधी डिसेंबर 2020 सत्राची UGC NET Exam ही 2 मे 2021 ते 17 मे 2021 रोजी होणार होती. परंतु देशभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढल्यामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली. नेट परीक्षेसाठी डिसेंबर 2020 च्या परीक्षेची अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी-मार्च 2021 पर्यंत सुरू होती. यावेळी परीक्षेसाठी नोंदणी केली मात्र, अर्ज सबमिट करू शकले नाहीत, असे उमेदवार देखील आता https:\\ugcnet.nta.nic.in किंवा www.nta.ac.in वर जाऊन अर्ज पूर्ण करू शकतात, असी माहिती UGCनं दिली आहे.
UGC NET 2021 Exam: NET 2021 exam dates announced; This is the last date- Learn how to apply
महत्त्वाच्या बातम्या
- इम्रान खान हे आतापर्यंतचे सर्वांत असहाय्य पंतप्रधान, पाकिस्तानात लोकशाही नावालाच- हमीद मीर
- अंशू प्रकाश मारहाण प्रकरणातून मुख्यमंत्री केजरीवाल तसेच सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता
- उत्तराखंडच् दुर्गम खेड्पाड्यात मध्ये आता चक्क मोटारीतून होणार न्यायदान, ई-न्यायालयाचा देशातील पहिलाच प्रयोग
- देशातील सर्वांत श्रीमंत तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा सुब्बरेड्डी यांची निवड